धर्मांध मजिद शेख याच्याविरुद्ध गुन्हा नोंद
|
संभाजीनगर – शाळेच्या बाहेर थांबून विद्यार्थिनीची छेड काढण्यास मज्जाव केल्याच्या प्रकरणी धर्मांध मजिद जमील शेख (वय २४ वर्षे) याने कन्नड कारखाना परिसरातील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.पी. चव्हाण आणि अधीक्षक संतोष जाधव यांच्यावर तलवारीने प्राणघातक आक्रमण करून त्यांना गंभीररित्या घायाळ केले. ही घटना ४ फेब्रुवारी या दिवशी कन्नड शहरातील मकरणपूर येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शेख याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
तरुणीच्या छेडछाडीबद्दल जाब विचारला; संतापलेला तरुण शाळेत तलवार घेऊन गेला अन्… https://t.co/f5sasVrWdX
— TejPoliceTimes (@Tejpolicetimes) February 4, 2022
१. कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयात इयत्ता १० वीपर्यंतचे वर्ग भरतात. गेल्या अनेक दिवसांपासून मजिद शेख हा शाळेच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकीवर फिरत मुलींची छेड काढत होता.
२. मुख्याध्यापक ए.पी. चव्हाण यांनी अनेकदा त्याला समजावून सांगितले होते. त्यानंतरही हा प्रकार थांबला नाही.
३. अंततः चव्हाण यांनी त्याला परिसरात येण्यास मज्जाव केला; मात्र ४ फेब्रुवारी या दिवशी शाळा सुटण्याच्या वेळी मजिद शाळेच्या प्रवेशद्वारासमोर आला आणि त्याने मुख्याध्यापक चव्हाण यांना दमदाटी केली. ‘स्कूल के सामने चक्कर मारते हुए मेरे फोटो निकालकर मेरे बाप को मोबाइल पर भेजता है क्या…’ असे म्हणत चव्हाण आणि संतोष जाधव यांच्याशी वाद घालून शिवीगाळ चालू केली अन् त्याने ‘पाहून घेतो’, अशी धमकी त्यांना दिली. (धर्मांधांची मुजोरी जाणा ! – संपादक)
हा प्रकार घडल्यानंतर मुख्याध्यापक चव्हाण आणि अधीक्षक जाधव हे मजिद याच्या वडिलांना सांगण्यासाठी मकरणपूर येथे जात होते. त्याच वेळी मजिद याने त्यांना रस्त्यातच गाठून त्यांच्यावर तलवारीने सपासप वार केले. या आक्रमणात हे दोघेही घायाळ झाले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात भरती केले. या घटनेनंतर आरोपी शेख पसार झाला आहे.
आरोपी शेख याच्या अटकेची शिक्षक संघटनांची मागणी
अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून आरोपीला अटक का करत नाही ?
शिक्षक सेना आणि शिक्षक भारतीसह इतर सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी शहर पोलीस ठाण्यासमोर जमले होते. ‘आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात येतील’, अशी चेतावणी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार आणि शिक्षक भारतीचे विनोद पवार यांनी दिली. यावर साहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश जाधव यांनी ‘आरोपीस २४ घंट्यांच्या आत अटक करू’, असे आश्वासन शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्यांना दिले.