महाबळेश्वर (जिल्हा सातारा) पोलिसांनी दिले महिलांना स्वरक्षणाचे धडे !

सातारा, ५ मार्च (वार्ता.) – महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता सातारा जिल्हा पोलीसदलाच्या वतीने ‘महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प’ राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत महाबळेश्वर पोलीसदलाने विद्यालयातील युवतींना स्वरक्षण प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून स्वरक्षणाचे धडे दिले.

महिलांवर होणारे बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ॲसिड आक्रमण, कौटुंबिक हिंसाचार यांविरुद्ध आणि अनैतिक मानवी व्यापारामध्ये बळी पडलेल्या पीडित महिला आणि बालके यांना आर्थिक साहाय्य व्हावे यांसाठी सातारा पोलीसदलाच्या वतीने ‘महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प’ राबवण्यात येत आहे. महाबळेश्वर येथील माखरीया हायस्कूल, अंजुमन हायस्कूल, गिरिस्थान हायस्कूल आणि एम.ई.एस्. स्कूल अशा ४ विद्यालयांतील २५० हून अधिक विद्यार्थिनींना या अंतर्गत स्वरक्षण प्रशिक्षण देण्यात आले.