Donald Trump Tariff On China : आयात शुल्क ३४ टक्क्यांवरून केले १०४ टक्के !

डॉनल्ड ट्रम्प यांचा चीनवर मोठा आघात !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क लागू केल्यानंतर जगभरात खळबळ उडाली असतांना आता ट्रम्प यांनी चीनवरील शुल्कात प्रचंड वाढ केली आहे. हे शुल्क ३४ टक्के १०४ टक्के करण्यात आले आहे. याचे मोठे परिणाम दिसून येणार आहेत.

चीननेही प्रत्युत्तरात अमेरिकेवर लावला होता ३४ टक्के कर !

ट्रम्प यांनी चीनवर ३४ टक्के कर लावल्यानंतर चीननेही प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेवरही ३४ टक्के कर आकारण्याचे घोषित केले. यामुळे संतापलेल्या ट्रम्प ‘८ एप्रिलपूर्वी चीनने ही वाढ मागे घेतली नाही, तर ५२ टक्के कर आकारला जाईल’, अशी चेतावणी दिली होती; मात्र चीनने माघार न घेतल्याने ट्रम्प यांनी ५२ ऐवजी त्याच्या दुप्पट, म्हणजे १०४ टक्के आयात शुल्क आकारण्याची घोषणा केली.

संपादकीय भूमिका

याला म्हणतात शत्रू देशाला धडा शिकवणे ! गांधीवादी देश कधीही अशी धमक दाखवू शकत नाही, हेही तितकेच खरे !