Murshidabad Violence : हिंदु पिता आणि पुत्र यांची केली हत्या !

  • मुर्शिदाबाद (बंगाल) येथे वक्फ सुधारणा कायद्याविरोधात मुसलमानांचा पुन्हा हिंसाचार

  • १० पोलीस घायाळ

  • ५ सहस्र मुसलमानांनी अडवला रेल्वेरुळ

  • सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांना केले तैनात

मुर्शिदाबाद (बंगाल) – वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुसलमानांकडून आंदोलन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर येथे शुक्रवार, ११ एप्रिल या दिवशी दुपारच्या नमाजापठणानंतर मोठ्या प्रमाणात मुसलमानांनी हिंसाचार केला. यावर १२ एप्रिललाही नियंत्रण मिळवण्यात आले नाही. या दिवशी धर्मांध मुसलमानांनी येथील जाफराबाद भागात एका हिंदु पिता आणि त्यांचा पुत्र यांची हत्या केली. हरगोविंद दास आणि चंदन दास अशी त्यांची नावे आहेत. ते हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती बनवण्याचा व्यवसाय करत होते. ३ दिवसांपूर्वी याच ठिकाणी मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन करून हिंसाचार केला होता. त्यांनी पोलिसांवर आक्रमण करून त्यांच्या अनेक गाड्यांची जाळपोळ केली होती. त्यानंतर पुन्हा तशीच घटना घडली. या हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ११५ मुसलमानांना अटक केली आहे.

१. शुक्रवारी दुपारी १२ ते १ च्या सुमारास मुर्शिदाबादमधील जंगीपूर आणि सुती भागांत मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. मुसलमानांनी राष्ट्रीय महामार्ग-१२ वर सरकारी बसगाड्या आणि अन्य वाहने यांची जाळपोळ केली. तसेच पोलिसांवर दगडफेक केली. यामुळे पोलिसांना स्वतःचे रक्षण करण्यासाठी एका मशिदीत जाऊन आश्रय घ्यावा लागला.

२. पोलिसांनी दंगलखोर मुसलमानांना पळवून लावण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या हिंसाचारामुळे राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. पश्चिम रेल्वेने दुपारी २.४६ वाजता अझीमगंज-न्यू फरक्का विभागात धुलियानगंगा स्थानकाजवळ सुमारे ५ सहस्र मुसलमानांनी रेल्वेरुळ अडवल्याची माहिती दिली होती.

३. मुर्शिदाबासपासून १० कि.मी. अंतरावरील शमशेर गंज येथे सहस्रो धर्मांध मुसलमानांनी जाळपोळ केली. येथील सरकारी विश्रामगृहाची तोडफोड करून त्याला आग लावली.

४. धुलियान रेल्वे स्थानकावर आक्रमण करून तेथील साहित्यांची तोडफोड करण्यात आली. तसेच येथे पोलिसांवर गावठी बाँबही फोडण्यात आला.

५. यापूर्वी मुर्शिदाबाद येथे इंटरनेट बंद करण्यात आले आहे. या हिंसाचारात अनेक पोलीस घायाळ झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांचे साहाय्य घेतले जात आहे. सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे.

६. राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी या हिंसाचाराच्या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. तसेच राज्यपाल बोस यांनी राज्य सरकारला मुर्शिदाबाद, मालदा आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यांतील संवेदनशील भागांत झालेल्या अशांततेसाठी उत्तरदायी असलेल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेश झालेला बंगाल ! बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या राज्यात ही स्थिती कायम रहाणार असल्याने हिंदूंचे आणि देशाचे रक्षण करण्यासाठी हे सरकार विसर्जित करून राष्ट्रपती राजवट का लावली जात नाही ? आणखी काय घडण्याची वाट पाहिली जात आहे ?
  • संभलमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या वेळी मुसलमानांच्या गोळीबारात मुसलमान मेल्यावर त्याविषयी आकंडतांडव करणारे बंगालमधील हिंदूंच्या हत्यांवर गप्प आहेत, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘राज्यात वक्फ कायदा लागू होणार नसल्याने शांत रहा !’ – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मुसलमानांना आवाहन

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुसलमान आंदोलकांना सांगितले की, राज्यात वक्फ कायदा लागू केला जाणार नाही. हा कायदा केंद्राने बनवला आहे, त्यामुळे तुम्हाला जे काही उत्तर हवे असेल त्याची केंद्राकडे मागणी करा. माझे आवाहन आहे की, शांत राहा. प्रत्येकाचे जीवन अमूल्य आहे. राजकारणासाठी दंगली भडकावू नका.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारचे आवाहन करण्याऐवजी हिंसाचार करणार्‍या धर्मांध मुसलमानांवर कारवाई का केली जात नाही ? ते सरकारचे जावई आहेत का ?