मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ रिक्त जागांसाठी २७ मार्च या दिवशी निवडणूक होणार आहे. भाजपने नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी, छत्रपती संभाजीनगर येथील प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, वर्धा येथील माजी आमदार दादाराव केचे यांची नावे घोषित केली.
आमशा पाडवी (शिवसेना), राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रवीण दटके (भाजप), गोपीचंद पडळकर (भाजप) आणि रमेश कराड (भाजप) हे विधानसभेत निवडून आले. त्यामुळे विधान परिषदेच्या जागा रिक्त झाल्या. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार १० ते १७ मार्च अर्ज भरणे, १८ मार्च अर्जांची पडताळणी, २० मार्च अर्ज मागे घेण्याचा दिवस आणि २७ मार्च या दिवशी मतदान होईल.
विधानसभेत २८८ पैकी महायुतीचे २३६ आमदार आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार येण्यासाठी विधानसभेतील आमदारही मतदान करतात. विधानसभेतील संख्याबळ पहाता विधान परिषदेतील ५ जागांपैकी मविआकडे एकही आमदार निवडून आणण्याइतके संख्याबळ नाही. विधान परिषदेच्या पाचही जागांवर महायुतीचे आमदार येऊ शकतात. मविआने उमेदवार उभे न केल्यास निवडणूक विनविरोध होईल.