घटनेमुळे तणाव
भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील टप्पाचबुत्रा परिसरातील हनुमान मंदिरात १२ फेब्रुवारी या दिवशी मांस ठेवल्याचे आढळून आल्यावर येथे तणाव निर्माण झाला. येथे हिंदु संघटनांचे कार्यकर्तेे मोठ्या संख्येने गोळा झाले होते.
पोलीस उपायुक्त चंद्र मोहन यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही घटनास्थळी पोचलो, तेव्हा मंदिराचे दरवाजे बंद होते. कुणीतरी प्राण्याचे मांस आत आणले असावे, असा आम्हाला संशय आहे. सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाची तपासणी चालू आहे.
संपादकीय भूमिका
|