Bade Hanuman Mandir : अक्षय्यवट आणि लेटे हनुमान मंदिर या प्रयागराजमधील धार्मिक स्थळांना भाविकांची अलोट गर्दी !

डावीकडून लेटे हनुमान मंदिर आणि अक्षय्यवट

प्रयागराज, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – त्रिवेणी संगमावर स्नान करून भाविक अक्षय्यवट आणि लेटे हनुमान मंदिर या प्रसिद्ध अन् जागृत धार्मिक स्थळी दर्शनासाठी जात आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली आहे. दर्शनासाठी भाविकांना २-३ तास रांगेत थांबावे लागत आहे. गर्दी असली, तरी भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे.