२ पोलीस कर्मचारी घायाळ

डोंबिवली (जिल्हा ठाणे) – येथे १४ मार्च या दिवशी २ गटांत पुष्कळ हाणामारी झाली. वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही आक्रमण करण्यात आले. त्यात २ पोलीस कर्मचारी घायाळ झाले. यासाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. डोंबिवलीतील आयरे गावात तणावपूर्ण शांतता आहे.
या प्रकरणी पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणणे, पोलिसांशी धक्काबुक्की करणे आणि त्यांना मारहाण करणे, या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ४ महिलांचाही समावेश आहे.
संपादकीय भूमिकापोलिसांवर आक्रमण होणे, हे आता नित्याचेच झाले आहे; पण यामुळे पोलीस खात्याला कलंक लागतो त्याचे काय ? |