‘मल्हार मटण’ या नावाला तीव्र विरोध करून प्रसंगी तीव्र आंदोलन करू !

जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांची चेतावणी

जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे

जेजुरी (पुणे) – महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावरील मल्हाराचे नाव आता ‘मल्हार झटका मटण’ असे दिले जात आहे. ‘मल्हार मटण’ या योजनेसाठी ‘मल्हार’ हे नाव वापरण्यास आमचा तीव्र विरोध आहे. सरकारने हे नाव पालटले नाही, तर वेळ आल्यास जेजुरीकरांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन करू, अशी चेतावणी जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी दिली आहे.

वीणा सोनवणे म्हणाल्या की,

१. ‘मल्हार’ या नावाला मार्तंड देवसंस्थान समितीच्या काही विश्‍वस्तांनी समर्थन देणे योग्य नाही. त्या विरोधात न्यायालयात दाद मागू.

२. मार्तंड देवसंस्थान समिती ही धार्मिक संस्था असून त्याने राजकीय हेतू साध्य करणे चुकीचे आहे. (हलालला विरोध आणि हिंदूंचे त्यापासून रक्षण करणे, हे राजकारण नाही, तर धर्मरक्षणासाठी उचललेले पाऊल आहे, हे वीणा सोनावणे यांनी लक्षात घेतले पाहिजे ! – संपादक)

३. रुग्णालयाच्या जागेवर भक्त निवासाचे बांधकाम नको. देवस्थानने त्या जागेवर रुग्णालयच उभारावे.

४. गडावरील धार्मिक विधी, रुढी आणि परंपरा जोपासणार्‍या पुजारी अन् ग्रामस्थ यांना विश्‍वासात घेतल्याविना निर्णय घेतले जातात, असा आरोपही सोनवणे यांनी केला.

संपादकीय भूमिका

मुळात हलाल जिहादशी दोन हात करण्यासाठी ही योजना आखण्यात आल्याने हा विरोधासाठी विरोध नाही ना ?