Amethi Mandir Re-Opened : उत्तरप्रदेशातील औरंगाबाद गावात २० वर्षांपासून मुसलमानांनी बंद केलेले हिंदु मंदिर उघडले !

मंत्रोच्चारात करण्यात आली पूजा

अमेठी (उत्तरप्रदेश) – अमेठी जिल्ह्यातील औरंगाबाद गावात असलेल्या १२० वर्षे जुन्या पंच शिखर शिव मंदिरात २० वर्षांनंतर पूजा करण्यात आली. प्रशासन आणि पोलीस यांच्या कडक बंदोबस्तात १६ फेब्रुवारीला मंदिरात वैदिक मंत्रांच्या जपाद्वारे पूजा करण्यात आली. (हिंदूंना त्यांचे मंदिर परत मिळवण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यांचे साहाय्य घ्यावे लागते, तर मुसलमान हिंदूंची मंदिरे सहज बळकावतात, हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक) या वेळी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.

१. हे मंदिर १२० वर्षांपूर्वी जेठुराम यांनी बांधले होते; परंतु गेल्या २० वर्षांपासून त्यावर  मुसलमानांनी अतिक्रमण केले होते आणि त्यामुळे ते बंद करण्यात आले होते. पंच शिखर शिव मंदिराच्या मुक्ततेसाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे आवाहन केले होते, त्यानंतर कारवाई करण्यात आली आणि मंदिर भाविकांसाठी पुन्हा उघडण्यात आले.

२. गावकर्‍यांचे म्हणणे आहे की, हे मंदिर पूर्वी पुजारी गणेश तिवारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या देखरेखीखाली होते; परंतु २ दशकांपूर्वी त्यांना स्थलांतर करण्यास भाग पाडण्यात आले. यानंतर मुसलमानांनी मंदिरावर अतिक्रमण केले आणि पूजा बंद झाली. आता प्रशासनाच्या कारवाईमुळे मंदिर भाविकांसाठी पुन्हा उघडण्यात आले आहे.

अशी अनेक मंदिरे बंद किंवा अतिक्रमित

स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, अमेठी आणि त्याच्या आसपासच्या भागात अशी अनेक ऐतिहासिक धार्मिक स्थळे आहेत, जी विविध कारणांमुळे बंद आहेत किंवा अतिक्रमणाचे बळी ठरली आहेत. प्रशासनाने इतर मंदिरेही मुक्त करावीत आणि धार्मिक स्वातंत्र्य राखावे, अशी त्यांनी मागणी केली. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतः अशा मंदिरांचा शोध घेऊन ती उघडत का नाही ? – संपादक)