परभणी येथील तुळजाभवानी मंदिराच्या बाजूचे मांसाहारी उपाहारगृह बंद पाडले !

मांसाहारी उपाहारगृह

परभणी – शहरातील जिंतूर रस्त्यावरील आयटीआय कॉर्नर परिसरात तुळजाभवानी मंदिर आहे. त्याच्या बाजूला मांसाहारी जेवणाचे उपाहारगृह चालू करण्यात आले. उपाहारगृहचालक मंदिर परिसरामध्ये घाण टाकत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे नेते आनंद भरोसे यांनी उपाहारगृहाचा परवाना आणि इतर कागदपत्रे पडताळली; पण ते न आढळल्याने त्यांनी उपाहारगृह बंद पाडले. उपाहारगृह चालकावर कारवाई न झाल्यास आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू, अशी चेतावणी आनंद भरोसे यांनी प्रशासनाला दिली. (अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

हिंदूंच्या मंदिरांच्या शेजारी मांसाहारी उपाहारगृहांना अनुमती प्रशासनाकडून कशी दिली जाते ?