काशीतील रजिया मशीद पूर्वीचे काशी विश्‍वानाथ मंदिर असल्याने तेथे पुन्हा मंदिर बांधा !

काशी राजपरिवारातील मुलीकडून याचिका !

गोमांस खात असल्यामुळे अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महाकालेश्‍वर मंदिरात जाण्यापासून रोखले !

हिंदू आता जागृत झाल्यामुळे ते आता अशा प्रकारे वैध मार्गाने विरोध करून त्यांच्या धार्मिक भावनांची नोंद घेण्यास भाग पाडत आहेत, हे कौतुकास्पद आहे !

नाशिक येथील सप्तश्रृंगीदेवीचे मंदिर घटस्थापनेला खुले होणार !

नाशिक जिल्ह्यातील वणी येथील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य शक्तीपीठ असलेले सप्तश्रृंगीदेवीचे मंदिर घटस्थापनेला खुले होणार आहे. मागील ४५ दिवसांपासून मंदिर दर्शनासाठी बंद आहे.

भाविकाला ५० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा तिरुपती देवस्थानाला ग्राहक न्यायालयाचा आदेश

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर असेच घडणार !

बदायू (उत्तरप्रदेश) येथील जामा मशीद पूर्वीचे नीलकंठ महादेव मंदिर ! – दिवाणी न्यायालयात पुराव्यांसह याचिका प्रविष्ट

जामा मशीद पूर्वी हिंदु राजा महीपाल यांचा गड होता आणि त्याच ठिकाणी आता नीळकंठ मंदिर आहे. एका याचिकेद्वारे मंदिर तोडून येथे मशीद उभारण्यात आल्याचे म्हटले आहे.

उज्जैन येथील हरसिद्धीदेवीच्या चरणी सामूहिक प्रतिज्ञेने मध्यप्रदेशात अभियानाला प्रारंभ !

२ मास चालणार्‍या या अभियानाच्या अंतर्गत मंदिरामध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करणे, मंदिर स्वच्छता करणे, समाज जागृतीसाठी व्याख्याने घेणे, अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

पुणे येथे दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर ३१ सहस्र महिलांकडून अथर्वशीर्ष पठण !

पुणे येथील ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळा’च्या वतीने ऋषिपंचमीनिमित्त १ सप्टेंबर या दिवशी अर्थवशीर्ष पठण करण्यात आले. पहाटे झालेल्या या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमामध्ये उत्सव मंडपासमोर ३१ सहस्र महिलांनी अथर्वशीर्ष पठण केले.

विरार येथील श्रीराम मंदिरातील दानपेटी फोडून चोरी

मंदिरांत वारंवार होणार्‍या चोरीच्या घटना रोखण्यासाठी हिंदूंनी आतातरी संघटित झाले पाहिजे !

काही वेळेस मंदिरेच कायदा आणि सुव्यवस्थेसाठी समस्या बनू लागल्यास त्यांना बंद करणेच योग्य !

भाविक मंदिरांमध्ये शांततेच्या शोधासाठी जात असतात; मात्र मंदिरेच आता कायदा आणि सुव्यवस्थेसाठी समस्या बनू लागली आहेत. त्यांचा मुख्य उद्देशच समाप्त झाला आहे.

हार-फूल यांवरील निर्बंधांविषयी धोरण ठरवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती ! – राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री

शिर्डी येथील साईबाबा मंदिरात असलेली हार-फूल यांवरील बंदी कायम असून याविषयी सर्वंकष धोरण ठरवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ३० दिवसांत या समितीला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.