अतिरिक्‍त भाडे आकारणार्‍या ‘ऑनलाईन बुकिंग अ‍ॅप’वर कारवाई करा ! – ‘सुराज्‍य अभियाना’चे निवेदन

प्रशासन स्‍वत:हून हे का करत नाही ?

उघडपणे होणार्‍या गुन्‍ह्यांसाठी भक्‍तांनी सांगितल्‍याविना कृती न करणे, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

गणेशोत्‍सवाच्‍या निमित्ताने अनेक खासगी प्रवासी ‘बुकिंग अ‍ॅप’ (आरक्षण करणारे अ‍ॅप) गणेशभक्‍तांची मोठ्या प्रमाणात लूटमार करत आहेत.

अधिक बसभाडे आकारणार्‍या १२ खासगी बसगाड्यांवर दंडात्‍मक कारवाई !

मागील ३ दिवसांपासून प्रादेशिक परिवहन विभागाने (आर्.टी.ओ.) महामार्गावर खासगी बसची पडताळणी चालू केली आहे. यात २७ बसगाड्यांपैकी १२ बसधारक अतिरिक्‍त भाडे आकारणी करत असल्‍याचे निदर्शनास आले.

खासगी ट्रॅव्‍हल्‍सच्‍या विरोधातील तक्रारीसाठी स्‍वतंत्र ‘हेल्‍पलाईन’ क्रमांक द्यावा !

बसस्‍थानके, खासगी ट्रॅव्‍हल्‍स आणि त्‍यांची तिकीट विक्री केंद्रे यांवर तक्रारीसाठी असलेला ‘हेल्‍पलाईन’ क्रमांक ठळकपणे लावण्‍यात यावा. ‘ट्‍विटर’, ‘फेसबूक’ आदी सामाजिक माध्‍यमांद्वारे याविषयी जागृती करावी’, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.

महानगरपालिकेच्‍या संकेतस्‍थळावरील आपत्ती व्‍यवस्‍थापनाचा अहवाल अद्ययावत करावा !

सर्वच महापालिकांनी संकेतस्‍थळावरील कोणकोणते अहवाल अद्ययावत करायचे आहेत, हे पहावे !
अशी मागणी का करावी लागते ? आपत्ती व्‍यवस्‍थापन विभागाच्‍या हे लक्षात येत नाही का ?

‘सुराज्य अभियान’

सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध घटनात्मक मार्गाने लढा देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियान’ चालू केले. शासकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील अपप्रकारांविरुद्ध घटनात्मक पद्धतीने लढा देणे आणि जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

हिंदु जनजागृती समितीचा अभिनव उपक्रम : सुराज्य अभियान !

आम्ही राबवत असलेल्या किंवा आपल्याला लक्षात आलेल्या काही नवीन मोहिमा आपण निश्चितपणे राबवू शकता. याविषयी कुणाला काही शंका किंवा कशा प्रकारे उपक्रम राबवायला हवेत ? याविषयी माहितीसाठी आम्हाला अवश्य संपर्क करा.

राज्यात राबवण्यात येणार्‍या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियाना’मध्ये ‘सुराज्य अभियाना’च्या सूचनांचा समावेश !

राज्यात राबवण्यात येत असलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियानामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून सुचवण्यात आलेल्या सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.

गोवा : सुराज्य अभियानच्या मागणीनंतर १० रुपयांची नाणी स्वीकारण्याविषयी दुकानांवर लावण्यात आली नोटीस !

‘सुराज्य अभियान’च्या वतीने १० रुपयांची नाणी स्वीकारण्याच्या ‘आर्.बी.आय.’ च्या आदेशाचे पालन करून नागरिकांची गैरसोय टाळावी, या मागणीचे निवेदन गोवा राज्य माहिती आणि प्रसिद्धी खाते अन् पणजी जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले होते.

‘बसस्थानक स्वच्छ’ अभियानात व्हिडिओद्वारे प्रवाशांपर्यंत स्वच्छतेचे महत्त्व पोचवणार !

राज्यातील बसस्थानके स्वच्छ करण्यासाठी एस्.टी. महामंडळाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक’ हे अभियान महाराष्ट्रदिनाच्या दिवशी घोषित केले आहे.