पोलिसांचा वेश परिधान करून ‘बिग कॅश पोकर’द्वारे जुगार खेळण्याचे आवाहन
मुंबई – महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश परिधान केलेले चित्रपट अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी लोकांना जुगार खेळण्याचे आवाहन करत असल्याचे विज्ञापन ‘बिग कॅश पोकर’ (Big Cash Poker) या ‘ऑनलाईन अॅप’ने केले आहे. जो पोलीस जुगार खेळणार्यांवर गुन्हे नोंदवून त्यांना अटक करतो, त्याच पोलिसांच्या वेशात असे विज्ञापन केले जाते, हे महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलीन करणारे आणि धक्कादायक आहे. हिंदु जनजागृती समितीचे ‘सुराज्य अभियान’ याचा तीव्र शब्दांत निषेध करते. या विज्ञापनाकडे दुर्लक्ष केले, तर अनेक अवैध, अनैतिक गोष्टींच्या विज्ञापनांसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशाचा वापर केला जाऊ शकतो.
.@SurajyaCampaign demands action against actor Nawazuddin Siddiqui for defaming the police in an online poker advertisement, ‘Big Cash Poker’.
👉 Ideally such a demand should never come through Public.
👉The Police are expected to take action against the concerned proactively.… https://t.co/65O67t6o6R pic.twitter.com/GwpjFN3kZW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 22, 2024
कर्तव्यावर असतांना आणि गणवेशात असतांना पोलीस जुगार खेळण्याचे आवाहन करतांना दाखवणे, हे अवघ्या महाराष्ट्रासाठी लज्जास्पद असून ‘बिग कॅश पोकर’ ‘ऑनलाइन अॅप’वर महाराष्ट्र पोलिसांनी तत्परतेने कठोर कारवाई करावी’, अशी मागणी ‘हिंदु जनजागृती समिती’च्या ‘सुराज्य अभियाना’ने केली आहे.
या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याकडे १४ ऑक्टोबर २०२४ या दिवशी तक्रार केली आहे. यामध्ये म्हटले आहे…
१. ‘बिग कॅश पोकर’चे मालक अंकुर सिंह, व्यवस्थापक आणि विज्ञापनात काम करणारे अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यावर गुन्हा नोंदवावा, तसेच ‘महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त आणि अपील) नियम १९७९’ आणि ‘महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१’ द्वारे कठोर कारवाई करावी.
#BREAKING | #viralvideo | #WATCH
🚨 “Big Cash Poker” calls for gambling with an actor in a police uniform!@SurajyaCampaign demands immediate action : File a case against @Nawazuddin_S for defaming the police ! @DGPMaharashtra @HinduJagrutiOrg ‘s ‘Surajya Abhiyan’ strongly… https://t.co/2cidQLus2b pic.twitter.com/QqfrfkFbcU
— Surajya Abhiyan (@SurajyaCampaign) October 22, 2024
२. महाराष्ट्र पोलीस कठोर परिश्रम आणि प्रशिक्षण घेऊन सिद्ध होतात; मात्र या विज्ञापनातून ‘ऑनलाईन जुगारा’मुळे त्यांच्यात कौशल्य येते, असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
३. पोलीस विभागातील कुणालाही स्वतःहून या अॅपवर कारवाई करावीशी वाटली नाही. या संदर्भात इतरांना तक्रार द्यावी लागत आहे, हे दुर्दैवी आहे.
४. या प्रकरणी पोलीस खात्याचे प्रमुख म्हणून गृहमंत्र्यांनीही लक्ष घालावे.
संपादकीय भूमिकावास्तविक अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांनी स्वतःहून याची नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित होते ! |