१. बांगलादेशात हिंदूंच्या हत्या होणे आणि हिंदूंची घरे लुटली जाणे
बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता इस्लामी धर्मांध जमावाने हिंसक आंदोलन करून संपुष्टात आणली. शेख हसीना यांनी स्वतः पंतप्रधानपदाचे त्यागपत्र देऊन भारताचा आश्रय घेतला. प्रारंभी सरकारविरोधी आंदोलन म्हणून चालू झाले होते. त्या आंदोलनाचे रूपांतर नंतर हिंदुविरोधी हिंसक आंदोलनात झाले. त्याअंतर्गत मंदिरांची तोडफोड केली जात आहे. सार्वजनिकरित्या हिंदूंची हत्या केली जात आहे. हिंदू महिलांवर बलात्कार होत आहेत. इस्लामिक धर्मांध जमावाकडून हिंदूंची घरे लुटली जात आहेत. या सर्व घटना दडपून टाकण्यासाठी आणि जे होत आहे, ते कसे योग्य आहे, हे पटवून सांगण्यासाठी जगभरातील सामाजिक माध्यमे पुढे सरसावली आहेत.
२. बांगलादेशात हिंदूंवर होणारे नृशंस अत्याचार !
बांगलादेशातील हिंदुविरोधी हिंसक आंदोलनात सातत्याने घडणार्या हिंसक घटना समोर आल्या. बांगलादेशातील पिरोजपूर जिल्ह्यात हिंदु महिलेवर बलात्कार करण्यात आला. जमावाने तिचे दागिनेही लुटले, याची कथा ती महिला स्वतः सांगत आहे. एका महिलेने सांगितले की, रात्री ते लोक आले. त्यांनी आमच्या घराची तोडफोड केली आणि सगळे काही लुटून नेले. त्या वेळी आम्ही लपून राहिलो; म्हणून वाचलो; पण माझी जाऊ त्यांच्या तावडीत सापडली. त्यांनी तिला दुसर्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
३. मंदिरांवर आक्रमणे करून त्यांचीही हानी करणे
बांगलादेशातील खुलनामधील एक मंदिर धर्मांधांनी पेटवून दिले आणि मंदिरातील मूर्ती फोडली. खुलनातील आणखी एका कालीमंदिराचीही अशीच हानी करण्यात आली. देशातील वेगवेगळ्या ठिकाणच्या मंदिरांना लक्ष्य करण्यात आले होते. काही ठिकाणी मूर्ती फोडल्या, आगी लावल्या, तर काही ठिकाणची मंदिरेच पूर्णपणे उद्ध्वस्त केली.
४. हिंदूंच्या अमानुष हत्या !
इस्लामिक धर्मांध हे हिंदूंची वेचून वेचून हत्या करत आहेत. हसीना यांच्या सरकारमध्ये असलेल्या हिंदु कर्मचार्यांची तर भर रस्त्यातच हत्या केली जात आहे. पोलीस अधिकारी संतोष साहा यांचीही धर्मांधांनी अमानुष हत्या केली. साहा यांच्या विद्रूप केलेल्या प्रेताची छायाचित्रे समोर आली आहेत. एक हिंदु पत्रकार, तसेच एक नगरसेवक यांचीही अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती.
५. हिंदूंचे हत्याकांड आणि त्यावर माध्यमांचे पांघरूण !
बांगलादेशात हिंदु महिलांवर बलात्कार होत आहेत, मंदिरे तोडली जात आहेत, सार्वजनिक ठिकाणी हत्या होत आहेत आणि या सगळ्यावर सामाजिक माध्यमे मात्र पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहेत. सतत भारत आणि हिंदुविरोधी भूमिका घेणारी माध्यमे यासंदर्भात हिंदूंची होत असलेली कत्तल कशी योग्य आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी वर्तमानपत्रातील रकानेच्या रकाने भरले जात आहेत.
अमेरिकेतील वर्तमानपत्र न्यूयॉर्क टाइम्स ‘हिंदूंची होणारी हत्या हा मुसलमानांचा बदला आहे’, असे सांगत आहे, तर भारतातील डाव्या विचारसरणीचा ‘मिडीया पोर्टल स्क्रोल ’ सांगत आहे की, बांगलादेशात हिंदूंच्या होणार्या हिंसेला भारतातील हिंदू उत्तरदायी आहेत.
६. धर्मांधांनी केलेल्या आक्रमणांमध्ये हिंदूंनाच उत्तरदायी ठेवण्याचा ‘न्यूयॉर्क टाइम्स’चा प्रयत्न !
(चित्रावर क्लिक करा)
न्यूयॉर्क टाइम्सने हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की, प्रारंभी हिंदूंनी इस्लामिक धर्मांधांवर अन्याय केला; म्हणून धर्मांधांनी त्याचा सूड घेतला. त्यातील लेखाच्या मथळ्यात दिले होते, ‘पंतप्रधान हसीना यांच्या राजीनाम्यानंतर हिंदूंचा सूड घेण्यास प्रारंभ केला. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगायचे आहे की, हिंदूंवरील आक्रमण ते हिंदू आहेत; म्हणून झालेले नाही किंवा धर्मांध हे मुसलमान होते; म्हणूनही झालेले नाही, तर हिंदू हे शेख हसीना सरकारचे समर्थक होते; म्हणून त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले. याचा अर्थ ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या म्हणण्यानुसार हिंदूंवर जी आक्रमणे झाली, ती त्याच्या धर्मामुळे झाली नाहीत, तर त्यांच्या राजकीय समर्थनामुळे झाली आहेत. या वृत्तामुळे सामाजिक माध्यमांवर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
७. हिंदुविरोधी ‘न्यूयॉर्क टाईम्स’ !
सामाजिक माध्यमांवर अभिनव अग्रवाल लिहितात, ‘जर कुणाला नरसंहार झाकायचा असेल, त्याला लपवायचे असेल, मुलांचे लैंगिक शोषण करणार्याला वाचवायचे असेल, तर त्याने कुविख्यात न्यूयॉर्क टाईम्सवर डोळे झाकून विश्वास ठेवावा.’ लोकांच्या संतप्त प्रतिक्रियांमुळे न्यूयॉर्क टाइम्सने लेखाचा मथळा पालटला, त्यातील ‘बदला घेतला’, हे सूत्र वगळले आणि ‘केवळ हिंदूंवर आक्रमण’ एवढेच शब्द ठेवले. मथळा पालटला असला, तरी त्या लेखात सांगण्यात आलेल्या भूमिकेत मात्र कोणताच पालट करण्यात आलेला नव्हता, तो तसाच हिंदुविरोधी ठेवला.
८. ‘पोर्टल स्क्रोल ’ही हिंदुद्वेषी !
भारतातील डाव्या विचारांच्या ‘पोर्टल स्क्रोल ’मधील लेखात बांगलादेशातील हिंसाचाराला भारतातील हिंदूच उत्तरदायी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्क्रोल च्या ८ ऑगस्टच्या अंकात नीलाद्री चटर्जी, महंमद असिफुल आणि एरिल्ड एनजेल्सन यांनी लेख लिहिला आहे.

या लेखात ते लिहितात, ‘सत्ताधारी पक्षाला सत्तेतून उखडून फेकल्यानंतरसुद्धा हुकूमशाही अवामी लीग सरकारवर असलेला संताप हिंसक रूपाने व्यक्त होत राहिला. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही; कारण कोणत्याही बंडानंतर हिंसक घटना या घडतच असतात. त्याला बांगलादेश तरी कसा अपवाद असणार ? स्क्रोल च्या म्हणण्यानुसार, सत्ता पालटल्यानंतर हिंसा होतच असते, ही सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे अस्वस्थ होण्याचे कारण नाही. हिंसा होणे हे कसे स्वाभाविक असते, हे पटवल्यानंतर स्क्रोल ने त्याचे खापर भारतातील हिंदूंवर फोडले.
स्क्रोल चे असे म्हणणे आहे की, भारतातील माध्यमांनी बांगलादेशात होत असलेल्या हिंदूंच्या विरोधातील हिंसक घटनांच्या बातम्या प्रसारित करून परिस्थिती बिघडवली. याचा अर्थ इस्लामिक धर्मांध आणि जमातची माणसे जे करत आहेत, त्याला भारतातील हिंदू उत्तरदायी आहेत. इतके सांगूनसुद्धा स्क्रोल चे मन तृप्त झाले नाही, तेव्हा त्यांनी हेही सांगितले की, हे जे धर्मांध आहेत, ती चांगली माणसे आहेत; पण भारतात मात्र त्यांचे चुकीचे चित्र दाखवले जात आहे. त्यासाठी मंदिराबाहेर मुसलमानांनी मानवी साखळी बनवली होती, याचे उदाहरण दिले आहे.
८ अ. हिंदूंनाच सर्वस्वी दोषी मानले ! : ‘स्क्रोल ’ला यातून काय सांगायचे आहे ? तर हिंसा ही होतच असते, तिचा बाऊ करण्याचे कारण नाही. त्यामुळे बांगलादेशात होणारी हिंसा ही काही वेगळी गोष्ट नाही, हे लक्षात घ्या ! हिंदूंवरील आक्रमणे धार्मिक कारणांमुळे होत नाहीत, तर हिंदूंनी आवामी लीगला पाठिंबा दिल्यामुळे होत आहेत. त्यात त्यांनी असेही सांगितले की, त्या जमावाला लुटालूट करायची होती; म्हणून त्यांनी आक्रमणे केली इतकेच !
९. डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून हिंदूंवरच दोषारोप !
बांगलादेशात हिंदूंवर होणार्या आक्रमणाच्या घटना दडपून टाकल्या आणि हिंदूंनाच उलट दोषी ठरवण्यात आले, पण हे काही नवीन नाही. यापूर्वी असे अनेक वेळा झाले आहे. वर्ष २०२३ मध्ये हरियाणातील नूंहमध्ये हिंदूंच्या यात्रेवर मुसलमानांनी आक्रमण केले; मात्र डाव्या विचाराच्या माध्यमांनी त्याचा दोष हिंदूंच्याच माथी थोपला. त्याचे म्हणणे होते की, हिंदू देवाला जलाभिषेक करायला आले होते. देवाला जलाभिषेक करणे चुकीचे आहे; कारण ते क्षेत्र मुसलमानांचे आहे; म्हणून मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले.
आजपर्यंत हिंदूंना सतत दडपण्यात आले आहे आणि असेच दडपले जाणार आहे. जोपर्यंत हिंदूंना ‘आपल्यावर अन्याय होतो’, असे वाटत नाही, तोपर्यंत हे असेच चालू रहाणार आहे.
– अर्पित त्रिपाठी, देहली
(साभार : ‘ऑपइंडिया’)