Action Against Obscene Videos PrayagrajMahakumbh : कुंभमेळ्यात महिलांचे अंघोळ करतांनाचे आक्षेपार्ह व्हिडिओ विकणार्‍या ३ जणांना अटक

प्रयागराज कुंभपर्व २०२५

  • व्हिडिओ विकून कमावले ९ लाख रुपये

  • गुजरातच्या राजकोट येथील रुग्णालयातील महिला रुग्णांचेही अश्‍लील व्हिडिओ विकले !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील महाकुंभात महिलांनी अंघोळ केल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून विक्री केल्याच्या प्रकरणात गुजरात पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये प्रयागराज येथील चंद्र प्रकाश नावाचा एक यू ट्यूबर (यू ट्यूब चॅनल चालवणारा) आहे, जो ‘सीपी मोंडा’ नावाचा यू ट्यूब चॅनल चालवतो. त्याच्याकडून महिलांचे अंंघोळ करतांनाचे आक्षेपार्ह व्हिडिओही जप्त करण्यात आले आहेत. त्याच्यासमवेतच महाराष्ट्रातील लातूर येथील प्रज्वल तेली आणि सांगली येथील प्राज पाटील यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पैसे कमवण्यासाठी त्यांनी राजकोट येथील रुग्णालयातील महिला रुग्णांचे आक्षेपार्ह व्हिडिओही मिळवले आणि ते टेलिग्रामवर अपलोड केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही ‘हॅकर्स’नी (एखाद्या व्यक्तीचा पासवर्ड अवैधपणे प्राप्त करून संबंधित व्यक्तीच्या अपरोक्ष त्याच्या खात्याचा उपयोग करणारे) रुग्णालयातील सीसीटीव्ही सिस्टम हॅक करून (नियंत्रण मिळवून) महिला रुग्णांचे चित्रीकरण मिळवले होते. नंतर प्रज्वल आणि प्राज यांनी हे चित्रीकरण मिळवले अन् ते ८०० ते २ सहस्र रुपयांना ऑनलाईन विकले. यातून, दोघांनीही गेल्या ७-८ महिन्यांत ८-९ लाख रुपये कमावले. दोघांकडून सुमारे २ सहस्र व्हिडिओ जप्त करण्यात आले. प्रज्वल आणि प्राज एकमेकांना ओळखतात.

संपादकीय भूमिका

अशा विकृतांना फाशीचीच शिक्षा दिल्यास इतरांवर वचक बसेल !