VHP Complaint : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या नावाने केली जात आहे फसवणूक ! – विहिंपची पोलिसांकडे तक्रार

विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले की, काही लोक श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या नावावर कोणतीही मान्यता न घेता पैसे मागत आहेत.

Morphed Photo : सामाजिक माध्यमांवर सक्रीय असणार्‍या एका महिलेच्या छायाचित्राचा अंतर्वस्त्राच्या विज्ञापनासाठी परस्पर वापर करण्यात आल्याचे उघड !

तक्रारीनंतर पोलिसांकडून अन्वेषण चालू !

Teens Social Media : किशोरवयीन मुलांकडून सामाजिक माध्यमांचा अधिकाधिक होत आहे वापर ! – प्यु रिसर्च सेंटर

सामाजिक माध्यमांच्या दुष्परिणामांची जाणीव असूनही असे होत असल्याचे यातून लक्षात आले आहे.

जगभरात ‘इंटरनेट’ वापरणार्‍यांचे प्रचंड वाढते प्रमाण !

आतापर्यंत अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत आवश्यकता समजल्या जात होत्या; परंतु आता ‘यांपैकी एखादी गोष्ट नसली, तरी चालेल; पण इंटरनेट हवेच’, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात पुढे आलेली माहिती देत आहोत.

उरुसाच्या मिरवणुकीमुळे ओढवलेल्या वादामध्ये ‘मुंबई ब्रेकिंग न्यूज’ वाहिनीकडून हिंदूंना दंगलखोर ठरवण्याचा प्रयत्न !

दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करून त्याविरोधात आवाज उठवणार्‍या हिंदूंनाच दंगलखोर ठरवणार्‍या धर्मांधांचा कावेबाजपणा ओळखा !

Law Against Deepfake : ‘डीपफेक व्हिडिओ’च्या विरोधात लवकरच कायदा होणार !

‘डीपफेक व्हिडिओ’, सिंथेटिक व्हिडिओ आणि खोटे वृत्त प्रसारित करणार्‍या वापरकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर त्यास सामाजिक माध्यमेच उत्तरदायी असतील.

३६ घंट्यांत ‘डीपफेक व्हिडिओ’ हटवा अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यास सिद्ध व्हा !  

केंद्र सरकारची सामाजिक माध्यमांना चेतावणी !

‘डीपफेक’ची डोकेदुखी !

‘डीपफेक’चे हे भयावह संकट रोखण्‍यासाठी समाज संयमी आणि नीतीमान असणे आवश्‍यक आहे अन् हे गुण साधनेने किंवा उपासनेनेच येऊ शकतात. तंत्रज्ञानाचे दुष्‍परिणाम टाळण्‍यासाठी समाजाने धर्माचरण करून नीतीवान आणि संयमी होणे अपेक्षित !

Disrespect To Chhatrapati Shivaji Maharaj, Again ! गुड्डेमळ, सावर्डे (गोवा) येथे २ मुसलमान युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना टिपू सुलतानच्या पायाशी दाखवले !

हिंदूंचा वंशविच्छेद करणारा, हिंदु महिलांवर अत्याचार करणारा टिपू गेला, तरी त्याचे वंशज अजूनही कार्यरत आहेत !

Google Account Policy : २ वर्षांपासून अधिक काळ जीमेल खाते वापरत नसल्यास गूगल ते १ डिसेंबरपासून बंद करणार !

खाते हटवण्यापूर्वी गूगल ईमेल पाठवून या संदर्भात माहिती देईल आणि त्यानंतर ते बंद करील. गेल्या २ वर्षांपासून जीमेल खाते वापरले नसल्यास ते पुन्हा सक्रीय करता येऊ शकते.