‘मेटा’ आस्थापनाचे संस्थापक आणि अब्जाधीश मार्क झुकरबर्ग यांनी दिली माहिती

न्यूयॉर्क (अमेरिका) : काही देशांमध्ये असे कायदे आहेत, ज्यांच्याशी आपण सहमत नाही. एक काळ असा होता, जेव्हा पाकिस्तानमध्ये कुणीतरी फेसबुकवर महंमद पैगंबर यांचे छायाचित्र शेअर केल्यामुळे माझ्याविरुद्ध खटला प्रविष्ट (दाखल) करण्यात आला होता. या प्रकरणात पाकिस्तानमध्ये मला मृत्यूदंड देण्याची मागणी होत होती. मला ठाऊक नाही की, प्रकरण कुठपर्यंत पोचले; कारण मी पाकिस्तानला जाण्याचा विचार करत नव्हतो, त्यामुळे जास्त काळजी केली नाही, अशी माहिती ‘मेटा’ या अमेरिकी आस्थापनाचे संस्थापक आणि अब्जाधीश मार्क झुकरबर्ग यांनी दिली. जो रोगन यांच्या ‘पॉडकास्ट’मध्ये (विविध विषयांचे संभाषण ध्वनीचित्रमुद्रित करून प्रसारित करणे) ते बोलत होते.
झुकरबर्ग म्हणाले की,
काही देशांचे कायदे आपल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या मूल्यांशी जुळत नाहीत. त्यांना फेसबुकवरील अशा बर्याच गोष्टी काढून टाकायच्या आहेत, ज्या आपल्याला चुकीच्या वाटत नाहीत. जर सरकारांनी तंत्रज्ञान आस्थापनांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली, तर ते एक मोठे सूत्र बनेल.