PIL – Prayagraj Stampede : महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या विरोधात जनहित याचिका प्रविष्ट !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज – येथे चालू असलेल्या महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला पहाटे चेंगराचेंगरी झाली. त्यात ३० जणांना प्राण गमवावे लागले. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत केंद्र तसेच राज्य सरकारला प्रतिवादी केले असून, अशा घटना घडू नयेत, यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि सुरक्षा उपाय करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.

महाकुंभ क्षेत्रातील दुर्घटना

महाकुंभ क्षेत्रातील दुर्घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच दुर्घटनेनंतर तात्काळ सहाय्य मिळावे, याकरिता पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.

१. चेंगराचेंगरीस उत्तरदायी अधिकार्‍यांवर कारवाई करा.

२. चेंगराचेंगरीत घायाळ झालेल्या ६० भाविकांना योग्य सुरक्षा मिळावी.

३. कुंभमेळा भरतो, त्याठिकाणी प्रत्येक राज्याला साहाय्यता केंद्र उभारण्याची अनुमती देणे

४. देशातील प्रमुख भाषांमध्ये माहिती फलक (डिस्पले बोर्ड) लावण्याची मागणी, जेणेकरून भाविकांना आपल्या भाषेत सूचना मिळून त्यांची सोय होईल.

५. बिगर हिंदी लोकांसाठी वैद्यकीय साहाय्य कक्ष स्थापन करणे.

६. उत्तरप्रदेश सरकारशी समन्वय साधत सर्व राज्यांनी महा-कुंभमेळ्यात डॉक्टर, नर्स यांच्यासह आपापली वैद्यकीय पथके स्थापन करावीत.