लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांच्या अंगरक्षकांकडून कावड यात्रेकरूंंना मारहाण

लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांच्या खासगी अंगरक्षकांनी काही कावड यात्रेकरूंना मारहाण केली. तेजप्रताप यादव येथील मार्गावरून वाहनातून चुकीच्या बाजूने जात असतांना त्यांना कावड यात्रेकरूंनी विरोध केला.

तत्कालीन लालूप्रसाद यादव यांच्या सरकारकडून म्हशींची शिंगे चमकवण्यासाठी १६ लाख रुपयांचा व्यय (खर्च)

बिहार सरकारने चारा घोटाळ्याच्या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार म्हशींची शिंगे चमकवण्यासाठी वर्ष १९९०-९१ ते १९९५-९६ या ५ वर्षांच्या कालावधीमध्ये तत्कालीन सरकारने ४९ सहस्र ९५० लिटर मोहरीचे तेल खरेदी करण्यापोटी १६ लाख रुपये व्यय (खर्च) केले होते.

(म्हणे) ‘न्यायाधीश सवर्ण असल्यामुळेच लालूप्रसाद यादव यांना शिक्षा झाली !’ – राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी

‘न्यायाधीशही जातीनुसार निर्णय देतात’, असे म्हणणे हा न्यायालयाचा अवमान आहे. अशांना थेट कारागृहातच डांबण्याचा आदेश न्यायालयाने दिला पाहिजे ! स्वतःच्या नेत्याच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी अशा प्रकारे कायदाद्रोही विधाने करणारे नेते जनहित काय साधणार ?

१४ वर्षांच्या शिक्षेतील केवळ २४ मास नगण्य आहेत ! – सर्वोच्च न्यायालय

चारा घोटाळ्याच्या प्रकरणात १४ वर्षांची शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

लालूप्रसाद यादव यांना १४ वर्षांची शिक्षा

चारा घोटाळ्यातील दुमका कोषागार प्रकरणात माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘सीबीआय’च्या) विशेष न्यायालयाने १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि ६० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

चौथ्या प्रकरणातही लालूप्रसाद यादव दोषी

झारखंडमधील डुमका येथील कोषागारातून बेकायदेशीररित्या ३ कोटी १३ लाख रुपये काढल्याच्या प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्र्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या ……

चारा घोटाळ्याच्या तिसर्‍या प्रकरणात लालूप्रसाद यादव यांना ५ वर्षांची शिक्षा

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सी.बी.आय.च्या) विशेष न्यायालयाने दोषी ठरवत ५ वर्षांची शिक्षा ठोठावली. याशिवाय त्यांना ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

चारा घोटाळ्याच्या प्रकरणी लालूप्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा तथा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) विशेष न्यायालयाने साडेतीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

लालूप्रसाद यादव यांच्यावरील शिक्षेची सुनावणी पुन्हा टळली

चारा घोटाळ्याच्या प्रकरणी दोषी असलेले लालूप्रसाद यादव यांच्यावरील शिक्षेची सुनावणी ५ जानेवारी या दिवशी पुढे ढकलली. सुनावणी पुढे ढकलली जाण्याची ही तिसरी वेळ आहे.

लालूप्रसाद यादव यांना कारागृहामध्ये विशेष सुविधा !

चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले लालूप्रसाद यादव यांची रवानगी रांची येथील बिसरा मुंडा कारागृहात करण्यात आली आहे. त्यांना येथील ‘अप्पर डिव्हिजन सेल’मध्ये ठेवण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF