Mahakumbh Fire Again : कुंभमेळ्यात पुन्हा आग, १५ तंबू जळून खाक !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज – कुंभमेळ्यात सेक्टर २२ मध्ये आग लागून त्यात १५ तंबू जळून खाक झाले. यापूर्वीही सेक्टर १८ मध्ये आगीची घटना घडली होती. अग्नीशमन दलाने तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

ज्या तंबूत आग लागली, तो तंबू अनधिकृत असल्याची माहिती अग्नीशमन विभागाचे अधिकारी प्रमोद शर्मा यांनी दिली. (अनधिकृत तंबू उभारले जाईपर्यंत प्रशासन काय करत होते ? – संपादक)