शिवपुरी (मध्यप्रदेश) – येथे भारतीय वायूदलाचे ‘मिराज २०००’ लढाऊ विमान कोसळले. त्यानंतर विमानाने पेट घेतला. या अपघातात विमानाचे दोन्ही वैमानिक घायाळ झाले. संरक्षण अधिकार्यांच्या माहितीनुसार विमानाने नियमित प्रशिक्षण उड्डाण घेतल्यानंतर काही वेळाने ते कोसळले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.