होळीसाठी कोकण रेल्वेमार्गावर ८ विशेष गाड्या

कोकणात होळी सणाला अनेक मुंबईकर गावी येत असतात, याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवणार आहे.

‘वन्दे  भारत’ मंगळुरूपर्यंत चालवण्यास आमचा विरोध ! – जयवंत दरेकर, कोकण विकास समितीचे अध्यक्ष

वन्दे भारत एक्सप्रेसच्या प्रस्तावित एकत्रिकरणास ठाम विरोध असून या सेवेचा  मंगळुरूपर्यंत विस्तार केल्यास मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा विभागातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

रेल्वेतून उतरतांना प्रवाशांनी चादर आणि ब्लँकेट रेल्वे कर्मचार्‍यांकडे देणे बंधनकारक !

भारतात प्रतिदिन रेल्वेने प्रवास करणार्‍यांची सरासरी संख्या अनुमाने १.८५ कोटी आहे. त्यांपैकी ८.५७ लाख लोक वातानुकूलित डब्यांतून प्रवास करतात. त्यांच्यासाठी रेल्वेकडून चादर आणि ब्लँकेट आणि काही वेळा टॉवेल दिले जातात.

चुकून वातानुकूलित डब्यात चढलेल्या महिलेला तिकीट तपासनीसाने गाडीबाहेर ढकलले !

अशा असंवेदनशील अधिकार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

धर्मांधांची मानसिकता जाणा !

अयोध्येहून कर्नाटकात परतणारी रेल्वेगाडी जाळण्याची धमकी देणार्‍या धर्मांधाला पोलिसांनी अटक केली आहे. २२ फेब्रुवारीच्या रात्री अयोध्येतून श्रीराममंदिराचे दर्शन घेऊन मोठ्या संख्येने भाविक परतत असतांना ही घटना घडली.

परीक्षा चालू असल्याने मध्य रेल्वेवरील लोकल वेळापत्रकानुसार चालवा !

केवळ परीक्षांच्या काळातच असे नव्हे, तर प्रतिदिनच लोकलसेवा वेळापत्रकानुसार व्हायला हवी, हे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात येत नाही का ?

मुंबईतील १९ उपनगरीय स्थानकांचा ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत पुनर्विकास होणार !

मुंबईतील १९ उपनगरीय स्थानकांचा ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार आहे. २६ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेचा शुभारंभ करतील.

जिना तोडल्याची पूर्वसूचना न दिल्याने प्रवाशांची फरपट !

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १, १ अ वरील एक जिना दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने १ आठवड्यापूर्वी तोडला आहे. यामुळे प्रवाशांना वळसा घेऊन फलाटावर यावे लागते.

दादर रेल्वेस्थानकातील पायर्‍यांवर संध्याकाळी वेश्या उभ्या रहातात !

भर गर्दीत वेश्यांनी सामान्य नागरिकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणे सामाजिक र्‍हासाचाच प्रकार होय ! हा प्रकार गंभीर असून कुणाच्या तक्रारीची वाट पहाण्यापेक्षा प्रशासनाने स्वत:हून हे प्रकार रोखायला हवेत. महाराष्ट्रासारख्या संतभूमीत असे प्रकार शोभनीय नाहीत !

पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याला भीषण आग !

या घटनेत रेल्वेचे आणखी २ डब्बे जळले. या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही. रेल्वे अधिकारी या घटनेचे अन्वेषण करत आहेत.