
सांगली – सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, ‘भाजप महाराष्ट्र रेल प्रकोष्ठ’चे अध्यक्ष कैलाश वर्मा, तसेच अन्य कार्यकर्ते यांच्या प्रयत्नांमुळे ‘हुबळी-प्रयागराज-वाराणसी’ या गाडीला सांगली आणि किर्लाेस्करवाडी येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीचे १४ फेब्रुवारीला सांगली रेल्वेस्थानकावर आगमन झाल्यावर भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत त्या गाडीचे भव्य स्वागत करण्यात आले. गाडीचे इंजिन आणि सर्व डबे यांना फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या अन् ‘जय श्रीराम’, तसेच ‘हर हर महादेव’ या घोषणांनी रेल्वे परिसर दुमदुमून गेला.
या प्रसंगी उद्योजक मनोहर सारडा, प्रसिद्धीप्रमुख केदार खाडिलकर, रेल्वे कार्यकर्ते विनोद दिवाणजी, विश्वजित पाटील, राजेंद्र कुंभार, अतुल माने, गीतांजली ढोपे-पाटील यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.