प्रयागराज कुंभपर्व २०२५
मिरज : प्रयागराज येथील महाकुंभसाठी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुब्बळ्ळी विभागाकडून हुब्बळ्ळी-वाराणसी-हुब्बळ्ळी अशी विशेष गाडी (क्रमांक ०७८३) चालू करण्यात आली आहे. ही गाडी मिरज येथून १४, २१ आणि २८ फेब्रुवारी या दिवशी दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी निघेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी १७ आणि २४ फेब्रुवारी, तसेच ३ मार्च या दिवशी निघेल. या विशेष गाडीस सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा हे थांबे देण्यात आले आहेत.
गाडी चालू होण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य किशोर भोरावत आणि पुणे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य गोपाल तिवारी, शिवनाथ बियाणी, अधिवक्ता विनीत पाटील यांनी प्रयत्न केले. कुंभमेळ्याला जाणार्या भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रवासी संघटनेचे मिरज येथील अध्यक्ष संदीप शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, मधुकर साळुंखे, पंडित कराडे, जयगोंड कोरे, श्रीकांत माने, वाय.सी. कुलकर्णी यांनी केले.