नंदीग्राम एक्सप्रेसच्या डब्याला आग; भीतीने प्रवाशांनी मारल्या उड्या !

कसार्‍याजवळ रेल्वे रुळाच्या बाजूला गवताला आग लागल्याने नंदीग्राम एक्सप्रेसच्या डब्याला आग लागली. यामुळे आतील प्रवासी जीव मुठीत घेऊन खाली उतरले. अनेक प्रवाशांनी रेल्वेतून खाली उड्या मारल्या.

९ नोव्हेंबरपासून फलाट तिकीट विक्री चालू !

दिवाळी आणि छटपूजा यांच्या कालावधीत पुष्कळ गर्दी होत असल्याने मध्य आणि पश्चिम रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लावले होते; मात्र ९ नोव्हेंबरपासून फलाट तिकीट विक्री पुन्हा चालू केली आहे.

‘Vande Bharat’ Ridiculous Instructions : ‘वन्दे भारत’ रेल्वेमध्ये हिंदी आणि मराठी भाषांतील एकत्रित हास्यास्पद सूचना !

सर्वसुविधांनी युक्त आणि अत्याधुनिक यंत्रणांचा उपयोग करण्यात आलेल्या ‘वन्दे भारत’ रेल्वेमधील डब्यांमध्ये प्रवाशांसाठी असलेल्या सूचनांमध्ये मात्र शब्दांच्या असंख्य चुका !

नालासोपार्‍यात तिकीट तपासनीसाचा उद्दामपणा आणि अरेरावी !

मराठीला अभिजात (उच्च) भाषेचा दर्जा मिळाल्यावरही होणारा मराठीद्वेष दुर्दैवी ! अशांना बडतर्फच करायला हवे !

Haryana Train Blast : रोहतक (हरियाणा) येथे रेल्वे गाडीत स्फोट : ४ जण घायाळ

रोहतक येथे जींद-देहली मेमो या रेल्वे गाडीमध्ये स्फोट झाल्याची घटना २८ ऑक्टोबरला घडली. या स्फोटामुळे गाडीमधील ४ जण भाजले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Bandra Railway Station : वांद्रे (मुंबई) येथे गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेसमध्ये चढतांना उत्तर भारतीय प्रवाशांची प्रचंड चेंगराचेंगरी

वांद्रे येथे २७ ऑक्टोबर या दिवशी पहाटे ५ वाजता गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेसमध्ये चढतांना उत्तर भारतीय प्रवाशांची प्रचंड चेंगराचेंगरी होऊन ९ जण घायाळ, तर २ जण गंभीर घायाळ झाले. ही गाडी पूर्ण अनारक्षित असते.

भारतीय रेल्वेचा तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देणारा ‘जागृती यात्रा उपक्रम !’

यंदाच्या वर्षीच्या यात्रेचा प्रारंभ १६ नोव्हेंबर २०२४ या दिवशी मुंबई येथून होणार आहे. या प्रवासात सहभागी उद्योजकांना विविध सामाजिक आणि आर्थिक वातावरण प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळेल.

Central Railway Ticket-Checking Drive : ऑक्‍टोबरमध्‍ये ११ सहस्र विनातिकीट प्रवाशांवर कारवाई !

एका महिन्‍यात एका राज्‍यात पकडण्‍यात आलेले फुकटे प्रवासी एवढे असतील, तर देशभरात न पकडलेले किती असतील, याचा विचारही न केलेला बरा !

दिवाळीत पुणे रेल्वेस्थानकावर होणार्‍या प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना !

दिवाळीत पुणे रेल्वेस्थानकावरून १ दिवसात अनुमाने दोन ते अडीच लाख प्रवासी प्रवास करण्याचा अंदाज आहे. उत्तर भारतात जाणार्‍या विशेषतः दानापूर, गोरखपूर, लखनऊ आदी गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी असते.

रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवास करणार्‍या ४०० पोलिसांवर दंडात्मक कारवाई !

अशा फुटक्या पोलिसांना रेल्वेत विनातिकीट प्रवास करू देणार्‍या रेल्वेच्या उत्तरदायी अधिकार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी !