(म्हणे) ‘पूर आला, तर त्याला आम्ही काय करणार ?’

गाडी चालवण्यासाठी एक यंत्रणा असते. त्यानुसार आम्ही आमचे काम केले. अचानक पूर आला, त्याला आम्ही काहीही करू शकत नाही, असे धक्कादायक विधान पश्‍चिम आणि मध्य रेल्वे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता यांनी एका वृत्तपत्रात प्रतिक्रिया देतांना केले आहे.

मुंबईत रेल्वे अपघातात एकाच दिवशी १६ जणांचा मृत्यू, तर १३ घायाळ

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या स्थानिक (लोकल) रेल्वेच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर १८ जुलैला विविध अपघातांत एकूण १६ प्रवाशांचा मृत्यू, तर १३ प्रवासी घायाळ झाले आहेत.

मुख्य अभियंता आणि उपायुक्त दोषी आढळल्यास कारवाई होईल ! – मुख्यमंत्री

येथील हिमालय पादचारी पूल दुर्घटनेच्या प्रकरणी सकृत दर्शनी दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात आली आली आहे. यामध्ये मुख्य अभियंता आणि उपायुक्त दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६ जून या दिवशी विधान परिषदेत केले.

सदोष दुरुस्तीमुळे हिमालय पूल कोसळला

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पुलाची दुरुस्ती अयोग्य प्रकारे केल्याने हा पूल कोसळल्याचे चौकशी अहवालामध्ये उघड झाले आहे.

हिमालय पूल दुर्घटनेचा अंतिम चौकशी अहवाल आयुक्तांना सादर 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील हिमालय पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचा अंतिम चौकशी अहवाल १५ मे या दिवशी चौकशी समितीने पालिकेचे नवे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे सादर केला.

सीएसएमटी हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी पहिले आरोपपत्र सत्र न्यायालयात प्रविष्ट !

सीएस्एम्टी हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी ९ मे या दिवशी आरोपींच्या विरोधात येथील सत्र न्यायालयात पहिले आरोपपत्र प्रविष्ट केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पूल दुर्घटनेच्या प्रकरणी आणखी एकाला अटक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पूल दुर्घटनेच्या प्रकरणी पोलिसांनी ७ मे या दिवशी आणखी एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला उपअभियंता असून शितला कोरी असे त्यांचे नाव आहे.

मुंबईकडे जाणार्‍या कामायनी एक्सप्रेसच्या जनरल डब्याला आग

वाराणसी येथून मुंबईकडे जाणार्‍या कामायनी एक्सप्रेसच्या जनरल डब्याला २२ एप्रिलच्या रात्री १० वाजता मनमाड आणि नांदगाव दरम्यान आग लागली.

पूर्वा एक्सप्रेसचे १२ डबे रूळांवरून घसरल्याने १३ जण घायाळ

येथील रुमा गावाजवळ हावडाहून देहलीला जाणार्‍या पूर्वा एक्सप्रेसचे १२ डबे रूळांवरून घसरल्याची घटना १९ एप्रिलच्या मध्यरात्री घडली. या अपघातात १३ जण घायाळ झाले आहेत.

वाशीतील पादचारी पुलाच्या दुर्घटनेतील उत्तरदायींवर आयुक्तांचे कारवाईचे आदेश

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन्. यांनी सेक्टर ८, वाशी येथील दुर्घटनाग्रस्त पादचारी पुलाची पाहणी केली आणि संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले. मागील मासातच या पुलाच्या दुरुस्तीचे काम संमत होऊन ८ मार्च या दिवशी हे काम चालू करण्यात आले


Multi Language |Offline reading | PDF