Pastor Bajinder Singh : पाद्री बाजिंदर सिंह याला बलात्काराच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

७ वर्षांनंतर निर्णय

पाद्री बाजिंदर सिंह

मोहाली (पंजाब) – ख्रिस्ती पाद्री बाजिंदर सिंह याला एका बलात्कार प्रकरणात मोहाली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. वर्ष २०१८ मधील या प्रकरणी २८ मार्च या दिवशी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. त्यानंतर न्यायालयाने बाजिंदर सिंह याला १ एप्रिल या दिवशी शिक्षा सुनावली. काही दिवसांपूर्वीच बाजिंदर सिंह याच्यावर एका तरुणीने विनयभंगाचा गुन्हा नोंदवला हाता.

शिक्षा झालेल्या प्रकरणातील पीडित महिलेला परदेशात स्थायिक होण्याच्या बहाण्याने बाजिंदर याने त्याच्या घरी नेले होते आणि तेथे बलात्कार केला होता. या घटनेचे त्याने चित्रीकरणही केल होते. ‘बलात्काराविषयी माझ्या विरोधात बोलल्यास व्हिडिओ सार्वजनिक करीन’, अशी धमकी त्याने दिली होती. पीडितेने दावा केला की, तिच्यासारख्या इतर अनेक महिलांचे बाजिंदरने शोषण केले होते.

शिक्षा टाळण्यासाठी बाजिंदरने न्यायालयाला सांगितले की, माझी मुले लहान आहेत. पत्नी आजारी आहे. माझ्या पायात सळी घालण्यात आली आहे, त्यामुळे माझ्यावर दया करा; मात्र न्यायालयाने त्याला जन्मठेपची शिक्षा सुनावली.

संपादकीय भूमिका

  • ‘पाद्री’ म्हणजे वासनांध व्यक्ती अशीच काहीशी प्रतिमा निर्माण झाल्याचे दिसून येते. विदेशात अनेक दशकांपासून पाद्र्यांकडून लहान मुले, महिला आदींचे लैंगिक शोषण करण्याच्या शेकडो घटना समोर आल्या असतांना आता भारतातही हीच स्थिती आहे, हे अशा प्रकरणांतून उघड होत आहे.
  • ७ वर्षांनी न्याय मिळणे, हा अन्यायच होय ! हिंदु राष्ट्रात तत्परतेने न्याय दिला जाईल !
  • हिंदु संतांवर खोटे आरोप करून त्यांच्यावर चिखलफेक करणारी प्रसारमाध्यमे एका पाद्र्याने केलेल्या कुकृत्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ देण्याचे आणि त्यावर चर्चासत्र आयोजित करण्याचे टाळतात, हे लक्षात घ्या !