भारतीय उद्योगपती नेस वाडिया यांना अमली पदार्थ बाळगल्यावरून जपानमधील न्यायालयाकडून २ वर्षांची शिक्षा

जपानमध्ये केवळ दीड मासामध्येच खटला चालवून शिक्षा होऊ शकते, हे भारतियांसाठी आश्‍चर्यकारकच होय ! भारतात एखाद्या मोठ्या उद्योगपतीला शिक्षा होणे, हेच मुळात आश्‍चर्यकारक ठरू शकते ! 

बलात्काराच्या प्रकरणी नारायण साई यांना जन्मठेप

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचे पुत्र नारायण साई यांना येथील सत्र न्यायालयाने दोन तरुणींवरील बलात्काराच्या प्रकरणी जन्मठेप आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही तरुणी बहिणी आहेत.

वयाच्या १६ वर्षांनंतर सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पोक्सो कायद्यातून सूट देण्यात यावी ! – मद्रास उच्च न्यायालयाचा सल्ला

अशामुळे समाजात अनाचार बोकाळणार नाही का ? न्यायालयच जर असा सल्ला देऊ लागले, तर समाजात नीतीमत्ता आणि सदाचार टिकवण्यासाठी सामान्य नागरिकांनी कोणाकडे आशेने पहायचे ?

(म्हणे) ‘न्यायाधीश सवर्ण असल्यामुळेच लालूप्रसाद यादव यांना शिक्षा झाली !’ – राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी

‘न्यायाधीशही जातीनुसार निर्णय देतात’, असे म्हणणे हा न्यायालयाचा अवमान आहे. अशांना थेट कारागृहातच डांबण्याचा आदेश न्यायालयाने दिला पाहिजे ! स्वतःच्या नेत्याच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी अशा प्रकारे कायदाद्रोही विधाने करणारे नेते जनहित काय साधणार ?

नारायण साई बलात्कार प्रकरणात दोषी

गुजरातमधील आश्रमात महिला साधकावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी संतश्री पूज्यपाद आसाराम बापू यांचे पुत्र नारायण साई यांना सुरतमधील जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले.

तडीपारीची व्याख्या पोलिसांनी जनतेला सांगितली पाहिजे ! – सुनील पवार, अध्यक्ष, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, रायगड

‘तडीपार कोणाला करता येते’ याची व्याख्या पोलीस प्रशासनाने घोषित करावी, अशी मागणी शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यासह अन्य ३ राजकीय पक्षांच्या तालुकाध्यक्षांना पोलिसांकडून ३ दिवसांसाठी तडीपारीची नोटीस !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांना पोलिसांकडून १५ एप्रिलला ३ दिवसांसाठी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचसमवेत ३ राजकीय पक्षांच्या तालुका अध्यक्षांसह ५ जणांना पोलिसांनी १६ एप्रिल या दिवशी तडीपारीची नोटीस बजावली आहे.

दिव्यांग तरुणीवर सामूहिक अत्याचार करणार्‍या ५ जणांना कारावासाची शिक्षा

येथील लोकमान्यनगर परिसरात जेवणाचा डबा आणण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय मानसिक दिव्यांग तरुणीवर सामूहिक अत्याचार करणार्‍या पाच जणांना कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका शमा मुल्लासह २१ जणांना ७ दिवस पोलीस कोठडी

कुख्यात मटकाबुकी सलीम मुल्लाचे पोलिसांवर आक्रमण केल्याचे प्रकरण : गुंडगिरी आणि अवैध व्यवसाय यांत नेहमीच अग्रेसर असणार्‍या लोकप्रतिनिधींचा भरणा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदीच हवी !

श्रीगोंदा येथे निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारणार्‍या ८७ कर्मचार्‍यांवर होणार फौजदारी गुन्हे नोंद !

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्तीचे आदेश देऊनही प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिलेल्या ८७ कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात येणार आहे, अशी माहिती साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे आणि तहसीलदार महेंद्र महाजन यांनी ७ एप्रिल या दिवशी दिली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now