Delhi Life Imprisonment For Raping Minor : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍याला आजीवन कारावासाची शिक्षा

  • १९ लाख ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचाही आदेश

  • अवघ्या २० दिवसांत खटला निकाली

नवी देहली – अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या प्रकरणी देहलीच्या तीस हजारी न्यायालयाने एका ४५ वर्षीय पुरुषाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याला आजन्म शिक्षा भोगावी लागणार आहे. यासह न्यायालयाने पीडितेला १९ लाख ५० सहस्र रुपये भरपाई देण्याचाही दिला. विशेष म्हणजे न्यायालयाने अवघ्या २० दिवसांत खटला निकाली काढला.

आरोपी पीडितेच्या वडिलांचा ओळखीचा होता आणि ती त्यांना ‘काका’ म्हणत असे. न्यायालयाने म्हटले आहे की, पीडितेला सदर आरोपीमुळे फार मानसिक वेदना आणि त्रास सहन करावा लागला असेल आणि ती अजूनही त्या वेदना सहन करत असेल. जरी तिचे दुःख पैशांनी भरून काढता येत नसले, तरी या भरपाईचा तिला अभ्यास करण्यास किंवा कौशल्य शिकण्यास साहाय्य होईल, जेणेकरून ती भविष्यात स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल.

संपादकीय भूमिका

  • जर न्यायालयाला २० दिवसांत खटला निकाली काढता येणे शक्य आहे, तर सर्वत्रच असे का केले जात नाही ?, असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होतो !
  • लव्ह जिहाद्यांनाही अशाच प्रकारे तात्काळ शिक्षा दिल्यास लव्ह जिहादाला कायमचा आळा बसेल !