|
(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)
ठाणे – जिहादी आतंकवादाला प्रोत्साहन देणार्या झाकीर नाईक याचे व्हिडिओ पाहून उल्हासनगरमधील गणेशनगर येथील हिंदु महिला कल्पना चौधरी यांच्या दृष्टी नावाच्या मुलीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. येथील मौलवीसह काही मुसलमानांनी दृष्टी हिचे नियोजनबद्ध धर्मांतर केल्याचे कल्पना चौधरी यांनी तक्रारीत म्हटले आहे. कल्पना चौधरी यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दृष्टी हिच्यासह पोलिसांनी १० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी आतापर्यंत २ जणांना पोलिसांनी अटक केली असून अन्य ८ आरोपींनी पलायन केले आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
या धर्मांतराच्या षड्यंत्रामध्ये स्थानिक मदरशांतील मौलवीही सहभागी आहे. मौलवीसह काही स्थानिक मुसलमानांनी दृष्टीला फूस लावून तिला इस्लाम धर्म स्वीकारायला लावला. या प्रकरणातील मौलवी बंदी घातलेल्या पी.एफ्.आय. (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या जिहादी आतंकवादी संघटनेशी संबंधित असल्याचे समजते.
हिंदु युवतीला इस्लामनुसार वागायला लावले !
कल्पना चौधरी यांच्या घराजवळच शबीना शेख आणि महेक शेख रहात होते. दृष्टी शबीना शेख यांच्या मुलींची शिकवणी घेण्यासाठी त्यांच्या घरी जात होती. या कालावधीत शेख कुटुंबियांनी दृष्टी हिला नमाजपठण करायला लावले, तसेच रोजा करण्यास सांगितला. तिला इस्लामनुसार वागायला लावले. शेख कुटुंबियांनी त्यांच्या मुलीसमवेत दृष्टी हिची बुरखा घातलेली छायाचित्रे संकेतस्थळावरूनही प्रसारित केली. एवढ्यावरच न थांबता दृष्टीच्या धर्मांतराची कागदपत्रेही सिद्ध केली. वडिलांच्या खात्यातील पैसेही काढले. उल्हासनगर येथील मदरशामध्ये दृष्टीचे धर्मांतर करण्यात आल्याची कागदपत्रे सिद्ध करण्यात आली. याविषयी कल्पना चौधरी यांनी वेळोवेळी मुलगी दृष्टी हिला समजवण्याचा प्रयत्न केला; मात्र ‘दृष्टीने न ऐकता मला मारहाण केली’, असे तिची आई कल्पना चौधरी यांनी तक्रारीत म्हटले आहे.
धर्मांतर केलेल्या मुलीकडून आईवर खोटे आरोप
या प्रकरणी कल्पना चौधरी यांनी पोलिसांत तक्रार केली असता दृष्टीने ‘आई वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडत असल्याचा, तसेच भाऊ आणि वडील बलात्कार करण्याचा प्रयत्न करत आहेत’, असे खोटे आरोप केले. (अशा प्रकारचे खोटे आरोप करण्यास सांगण्याचेही मुसलमानांनीच शिकवले असणार, हेच लक्षात येते ! यातून कशा प्रकारे बुद्धीभेद केला जातो, याचा विचार केला पाहिजे ! – संपादक) या वेळी कल्पना चौधरी यांनी दृष्टीच्या धर्मांतराविषयीची कागदपत्रे पोलिसांना दाखवून झालेल्या प्रकार सांगितला. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने आणि पालकही मुलांना धर्मशिक्षण देत नसल्याने आणि हिंदूंमध्ये धर्माभिमान नसल्याने धर्मांध मुसलमान अशांचा बुद्धीभेद करून त्यांचे धर्मांतर करत असल्यास आश्चर्य ते काय ? |