SDPI : (म्‍हणे) ‘मुसलमानांना लक्ष्य करून दंगल करण्‍यात आली !’ – सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया

नागमंगल दंगलीच्‍या प्रकरणी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा फुकाचा आरोप

वर्तुळात अब्‍दुल मजीद

मंड्या (कर्नाटक) – येथील नागमंगलमध्‍ये झालेली दंगल पूर्वनियोजित होती. दंगलींमध्‍ये मुसलमानांची दुकाने आणि मालमत्ता यांना लक्ष्य करून आग लावण्‍यात आली. या दंगलीची न्‍यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया या बंदी घातलेल्‍या जिहादी संघटनेची राजकीय शाखा असणार्‍या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (एस्.डी.पी.आय.ने) कर्नाटक सरकारकडे केली आहे. पक्षाचे राज्‍याध्‍यक्ष अब्‍दुल मजीद यांनी दंगलग्रस्‍त भागाला भेट दिल्‍यानंतर ही मागणी केली.

१. माजीद म्‍हणाले की, श्री गणेशमूर्ती मिरवणुकीला हेतूपुरस्‍सर मशिदीसमोर थांबवण्‍यात आले. मिरवणुकीतील काही उपद्रवी लोकांनी चिथावणीखोर घोषणा देऊन तणावपूर्ण वातावरण निर्माण केले. त्‍यानंतर मुसलमानांच्‍या दुकानांना लक्ष्य करून आग लावली.  पोलीस ठाण्‍यासमोरील दुकानांना आग लावली जात असतांना पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्‍यामुळे ही दंगल पूर्वनियोजित होती, अशी शंका अधिक बळकट होते.

२. माजीद यांनी पोलिसांवर आरोप करतांना म्‍हटले की, दंगलीच्‍या आरोपावरून मुसलमानांच्‍या घरांची दारे फोडून आत घुसून पोलिसांनी महिलांना ढकलले आणि तरुणांना अटक केली. दंगल मुसलमानांच्‍या विरोधात झाली, जळलेली मालमत्ता आणि दुकाने मुसलमानांची आहेत, तरी अटक मात्र मुसलमानांनाच होत आहे. हा कोणता न्‍याय आहे? पोलिसांनी निष्‍पाप लोकांना अटक केली असून त्‍यांना त्‍वरित मुक्‍त करावे, अशी मागणी मजीद यांनी या वेळी केली.

संपादकीय भूमिका  

भारतात होणारी प्रत्‍येक दंगल धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंना लक्ष्य करून केली जाते, हा इतिहास आणि वर्तमान आहे. भविष्‍यातही हेच घडत रहाणार असून यातही कुणाचे दुमत असणार नाही; मात्र जाणीवपूर्वक स्‍वतःला पीडित दाखवण्‍याचे कथानक मुसलमानांकडून नेहमीच रचले जाते, तेच ही संघटना या वेळीही करत आहे !