वर्ष २०२२ मध्ये झाली होती हत्या !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ उच्च न्यायालयाने बंदी घालण्यात आलेली जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पी.एफ्.आय.च्या) १७ आरोपींना जामीन संमत केला. पलक्कडमध्ये वर्ष २०२२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते ए. श्रीनिवासन् यांची हत्या केल्याचा आरोप या जिहाद्यांवर आहे. या आरोपींविरुद्ध बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (यु.ए.पी.ए. अंतर्गत) आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) करण्यात आले होते. ५१ आरोपींपैकी आतापर्यंत ४४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्वांचा श्रीनिवासन् यांच्या हत्येत सहभाग होता.
संपादकीय भूमिकासंघ नेत्याच्या हत्येच्या प्रकरणातील बंदी घातलेल्या संघटनेच्या १७ जणांना दीड वर्षात एकाच वेळी जामीन मिळतो; मात्र अशा प्रकरणांत अडकवल्या गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांना अनेक वर्षे जामीन मिळत नाही ! |