राज्यात झालेल्या बाँबस्फोटांत सहभाग
कारवार (कर्नाटक) – आतंकवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या आणि सामाजिक माध्यमांत चिथावणीखोर मजकूर प्रसारित केल्याच्या आरोपावरून बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अब्दुल शकूर नावाच्या सदस्याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने उत्तर कन्नड जिल्ह्यातील शिरसी तालुक्यातील दासनकोप्पळ येथून अटक केली.
दुबईत काम करत असलेला अब्दुल शकूर काही दिवसांपूर्वी बकरी ईद साजरी करण्यासाठी स्वतःच्या गावी आला होता. रामेश्वरम् कॅफे बाँबस्फोट, तसेच अन्य काही ठिकाणी बाँबस्फोट घडवण्यात सहभाग असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.