Raebareli Fake Birth Certificate : उत्तरप्रदेशातील ६ गावांतून बनवण्यात आली २० सहस्र बनावट जन्म प्रमाणपत्रे

  • रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमानांना मिळाला लाभ !

  • १० जणांना आतापर्यंत अटक

अटक करण्यात आलेले आरोपी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने राज्यातील  रायबरेली जिल्ह्यातील सलोन तालुक्यातील ६ गावांत सुमारे २० सहस्र जणांची ऑनलाईन जन्म प्रमाणपत्रे जारी केल्या प्रकरणी आतापर्यंत १० लोकांना अटक केली आहे. गोविंद केसरी, आकाश, संजीव सिंह, वैभव उपाध्याय, सलमान अली आणि शाहनवाज अशी त्यातील काही जणांची नावे आहेत. त्यांनी देशात घुसखोरी करणारे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान यांना बनावट जन्म प्रमाणपत्रे दिली होती. सर्व जन्म प्रमाणपत्रे गावातील ग्राम विकास अधिकार्‍याच्या डिजिटल स्वाक्षरीने खासगी जन सुविधा केंद्रातून ऑनलाईन जारी केली आहेत. अधिकार्‍यासह ४ जणांना याआधीच अटक करण्यात आली होती.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या सदस्याचा सहभाग

आतंकवादविरोधी पथकाने या प्रकरणी बंदी घालण्यात आलेली जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या एका सदस्याला अटक केली होती. त्याच्याकडून जप्त केलेली सर्व कागदपत्रे रायबरेलीच्या पलाही गावाच्या पत्त्यावर सिद्ध केली होती. पलाही गावाच्या जवळ जन सुविधा केंद्रातून ही कागदपत्रे जारी केली होती. अटक करण्यात आलेल्या या सदस्याने मान्य केले होते की, केरळ, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमधील अनेकांची जन्म प्रमाणपत्रे रायबरेलीतून बनवण्यात आली.

संपादकीय भूमिका

  • इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट जन्म प्रमाणपत्रे बनवून दिली जाईपर्यंत पोलीस, गुप्तचर आदींना याची माहिती कशी मिळाली नाही ?
  • बनावट जन्म प्रमाणपत्रे बनवून घुसखोरांना देणार्‍या देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा करण्याची आवश्यकता आहे !