|
बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील चिक्कमंगळुरू येथील बसस्थानकातील कर्नाटक परिवहन विभागाच्या एका बसवर हनुमानाचे स्टिकर लावल्याचे एका मुसलमान तरुणाला आढळले. यावरून त्याला पोटशूळ उठला आणि त्याने त्याचे छायाचित्र काढून ‘एक्स’वरून (ट्विटरवरून) प्रसारित केले अन् त्यामध्ये राज्याचे काँग्रेसचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहन विभाग यांना ‘टॅग’ केले.
Karnataka Hanuman Sticker : “Hanuman stickers cannot be placed on buses !”
SDPI activist complains against the Karnataka Transport Department.
KSRTC has also taken note of the post regarding the objection.
Is this Pakistan or Bangladesh where Hanuman stickers cannot be… pic.twitter.com/2SgCwI6e8a
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 4, 2024
‘हिंदु देवतांची चित्रे सार्वजनिक वाहनांवर अशा प्रकारे लावता येणार नाहीत. कृपया चालक आणि ऑपरेटर यांवर कारवाई करा !’, असेही त्यात लिहिले. याची परिवहन विभागाने दखल घेत ‘हा विषय चिक्कमंगळुरू येथील डेपोला वर्ग केले आहे’, असे उत्तर दिले आहे. खरेतर त्या छायाचित्रात बसच्या मागील बाजूच्या काचेवर एका बाजूला हनुमानाचे एक छोटेसे चित्र लावले आहे.
आरिफ अरवाह असे या मुसलमान तरुणाचे नाव असून तो बंदी घालण्यात आलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची विद्यार्थी संघटना ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चा सरचिटणीस असल्याचे म्हटले जात आहे.
परिवहन विभागाने या ‘पोस्ट’ची दखल घेतल्यामुळे कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार हिंदुविरोधी असल्याचा आरोप होऊ लागला आहे. अनेक हिंदूंनी काँग्रेस सरकारला लक्ष्य केले असून त्याला ‘हिंदुविरोधी’ म्हटले आहे. ‘एक्स’च्या एका वापरकर्त्याने लिहिले की, ही कारवाई काँग्रेस सरकारच्या सांगण्यावरून होत आहे. सरकार हिंदुविरोधी आहे, अन्यथा अशा वापरकर्त्यांच्या पोस्टला विभागाने प्रतिसाद दिलाच नसता !
संपादकीय भूमिका
|