श्री गणेशाचे चित्र असलेल्या फरशीवर थुंकणार्‍या धर्मांधावर कारवाई करा !

सांगलीतील हिंदूंची निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षकांकडे मागणी

पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे (मध्यभागी) यांना निवेदन देतांना हिंदु कार्यकर्ते आणि ग्रामस्थ

बत्तीसशिराळा (जिल्हा सांगली) – गेल्या आठवड्यात सागांव येथील श्री मरिमाईदेवीच्या मंदिरात असलेल्या श्री गणेशाचे चित्र असलेल्या फरशीवर एक अल्पवयीन धर्मांध थुंकत असल्याचे आणि त्यावर घाण टाकत असल्याचे गावकर्‍यांच्या लक्षात आले. यानंतर गावकर्‍यांनी संबंधित अल्पवयीन धर्मांधास विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी या मुलाच्या कुटुंबियांना समज दिली, तसेच ‘श्री गणेशाचे चित्र असलेल्या फरशीवर थुंकणार्‍या अल्पवयीन धर्मांधावर कारवाई करा’, या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांना दिले. यावर पोलीस निरीक्षकांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

या संदर्भात ग्रामस्थांनी एकत्र येत तात्काळ ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेतली आणि सागांवच्या सरपंचांना निवेदन दिले. ग्रामस्थ आणि भक्त यांनी संबंधितांना जाब विचारला असता त्यांनी त्यांच्या धर्माच्या लोकांना एकत्र करून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हिंदु समाजाच्या भावना तीव्र असून अल्पवयीन धर्मांधावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी या निवेदनात केली आहे. हे कुटुंब या गावात भाड्याने रहात असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले.

या प्रकरणी सर्वश्री प्रवीण पाटील, संजय पाटील, प्रतिक लोहार, विराज पाटील, विघ्नेश पाटील, किरण गांधी, कार्तिक पाटील, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाबा परीट, दिलीप पाटील या सर्वांनी पुढाकार घेतला. ‘हिंदु धर्माच्या संदर्भात कोणताही अवमान घडल्यास आम्ही यापुढील काळातही सजग राहून तात्काळ कृती करू’, असे या सर्वांनी सांगितले.