‘हमारा देश संघटने’चे खासदार जगदीश शेट्टार यांना निवेदन

बेळगाव – बंगाल येथील हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या संदर्भात भाजपचे खासदार जगदीश शेट्टार यांना निवेदन देण्यात आले. जगदीश शेट्टार यांनी हिंदूंवर होणार्या अत्याचाराविषयी आवाज उठवावा, तसेच केंद्र सरकारने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट आणावी यांसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी या प्रसंगी केली.
जगदीश शेट्टार यांनी ‘हमारा देश’ संघटनेच्या मागणीची नोंद घेत ‘या संदर्भात निश्चित योग्य ती कृती करू’, असे आश्वासन दिले. हेच निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही पत्राद्वारे पाठवण्यात आले आहे.