नेपाळचे पंतप्रधान ओली यांचे सरकार विसर्जित

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत अचानकपणे संसद विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंत्रीमंडळाची ही शिफारस राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांच्याकडे पाठवण्यात आली.

हरिद्वार येथील वर्ष २०२१ च्या कुंभमेळ्यात होणार कोरोना नियमांचे पालन !

पुढील वर्षी मार्च ते एप्रिल मासामध्ये कुंभमेळा होणार आहे. कोरोनाच्या काळात होत असलेल्या या कुंभमेळ्याच्या निमित्ताने सर्व प्रकारचे नियम पाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सामाजिक अंतर राखत येथे गंगा नदीमध्ये भाविकांना स्नान करावे लागणार आहे.

उज्जैनच्या महाकालेश्‍वर मंदिर परिसरात उत्खननात सापडले १ सहस्र वर्षे प्राचीन मंदिर !

इस्लामी आक्रमणाच्या वेळी मंदिर पाडून त्यावर भराव घातल्याची शक्यता !

केंद्र आणि राज्य शासन एकत्र आल्यास कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या भूमीचा वाद सोडवता येईल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कांजूरमार्ग येथील मेट्रोच्या जमिनीसाठी केंद्र आणि राज्य शासन वाद करत राहिले, तर हा वाद सोडवणार कोण ? केंद्र आणि राज्य एकत्र येऊन हा वाद सोडवता येईल.

काबूलमध्ये ५ बॉम्बस्फोटांत ९ जण ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका पाठोपाठ ५ साखळी बॉम्बस्फोटांमध्ये ९ जण ठार झाले, तर २० हून अधिक जण घायाळ झाले. शहरातील विविध भागांत हे स्फोट झाले.

शिर्डी संस्थानकडून दर्शनासाठी नवीन नियमावली घोषित !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिर्डी संस्थानने नाताळच्या निमित्ताने साई दर्शनासाठी नवी नियमावली घोषित केली आहे.

तृणमूल काँग्रेसविरुद्ध आणि भाजपला मत दिले, तर रक्ताचे पाट वहातील ! – बंगालमध्ये भिंतीवर धमकी !

बंगालमध्ये लोकशाहीचे तीनतेरा वाजवण्यात आले आहेत, हेच या धमकीतून उघड होते. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय स्थिती पहाता येथील सरकार विसर्जित करून राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील एका शाळेत शिकवला जातो जरासंधाने भगवान श्रीकृष्णला पराजित केल्याचा चुकीचा इतिहास !

चुकीचा इतिहास शिकवणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे !

पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी गुरुवायूर मंदिराकडून घेतलेले १० कोटी रुपये परत द्या !

केवळ पैसेच परत घेऊ नयेत, तर असा निर्णय घेणार्‍यांना न्यायालयाने दंड ठोठावला पाहिजे. जर यापूर्वीही अशा प्रकारे मंदिराचे पैसे सामाजिक कार्यासाठी वापरले गेले असतील, तर तेही परत घेण्यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे !

सत्ताधारी माकपच्या कार्यकर्त्यांकडून मंदिरात तोडफोड, देवतांच्या मूर्तींचा अवमान आणि चोरी

केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या विजयाचा उन्माद ! अशी गुंडगिरी करणारे माकपवाले म्हणे पुरो(अधो)गामी आणि सहिष्णु ! अशा घटनांविषयी एकही पुरो(अधो)गामी किंवा निधर्मीवादी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !