कोची (केरळ) – सध्या चालू असलेल्या पितृपक्षाच्या निमित्ताने १८ सप्टेंबर या दिवशी आलुवा येथील श्री दत्त आंजनेय मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. सनातन संस्थेच्या कु. अदिती सुखटणकर यांनी या प्रवचनामध्ये ‘पितृदोष, भगवान दत्तात्रेयांच्या उपासनेचे महत्त्व, पितृपक्षात दत्ताचा नामजप आणि श्राद्ध करण्याचे महत्त्व’, यांविषयीची माहिती सांगितली. या प्रवचनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.
क्षणचित्रे
१. प्रवचनानंतर उपस्थित जिज्ञासूंनी दत्ताचा सामूहिक नामजप मनापासून केला.
२. प्रवचनानंतर काही जिज्ञासूंनी ‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.