१२ सहस्र साईभक्तांनाच मंदिरात प्रवेश
शिर्डी (जिल्हा नगर) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी संस्थानने नाताळच्या निमित्ताने साई दर्शनासाठी नवी नियमावली घोषित केली आहे. त्यानुसार गर्दीच्या काळात दर्शन पास काऊंटरवर मिळणार नाहीत. साईभक्तांना संस्थानाच्या संकेतस्थळावर पास आरक्षित करावा लागणार आहे.
(सौजन्य : Zee 24 Taas)
मार्गदर्शक सूचनांचे पालन करून गर्दीच्या काळात जास्तीत जास्त १२ सहस्र साईभक्तांनाच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देणे शक्य होणार आहे. सशुल्क दर्शनपासाचे आरक्षण केल्यापासून तो ५ दिवस आणि विनामूल्य दर्शनपासाचे आरक्षण केल्याच्या दिनांकापासून तो दोन दिवसांसाठी उपलब्ध असेल.