भिवंडी – येथे गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत २ गटांतील वादानंतर भिवंडीचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांचे ठाणे शहर मुख्यालयात स्थानांतर करण्यात आले. (स्थानांतर करून मूळ दंगलीचा प्रश्न कसा सुटेल ? – संपादक) मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त मोहन दहीकर भिवंडीचे पोलीस उपायुक्त झाले आहेत. दगडफेकीनंतर ‘आरोपींवर कारवाई झाल्याविना विसर्जन होणार नाही’, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यात पोलीसही घायाळ झाले. काहींना पोलिसांनी कह्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.