मुंबई – दादर ते विरार दरम्यान लोकलगाड्यांच्या १० फेर्या चालू करण्याचे नियोजन रेल्वेचे आहे. वाढीव फेर्यांनंतर पश्चिम रेल्वेवरील फेर्यांची संख्या १ सहस्र ४०६ पर्यंत पोचणार आहे. बारा डब्यांच्या १२ लोकलगाड्यांचे रूपांतर १५ डब्यांच्या लोकलगाड्यांमध्ये करण्यात येणार आहे. सध्या १५ डब्यांच्या १९९ गाड्या आहेत. त्या २०९ करण्यात येणार आहेत.
गेल्या पंधरवड्यापासून गोरेगाव ते कांदिवली दरम्यान नवीन सहावी मार्गिका उभारण्याचे काम वेगाने चालू आहे. सहाव्या मार्गिकेच्या पूर्तीनंतर नव्या १२ लोकलगाड्या चालू करण्यात येणार आहेत.