डिचोली, २० सप्टेंबर (वार्ता.) – डिचोली शहरातील पिराची कोंड या भागातील अवैध झोपडपट्टीवर नगरपालिकेने कारवाई करत ही झोपडपट्टी हटवली. मागील काही वर्षांपासून या झोपडपट्टीविषयी वाद चालू होता. न्यायालयाच्या आदेशानुसार २० सप्टेंबरला डिचोली नगरपालिकेने प्रशासकीय यंत्रणेच्या साहाय्याने ही कारवाई केली. अवैधपणे उभारलेल्या १० झोपड्या हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार पालिकेचे कर्मचारी ही कारवाई करण्यासाठी जेसीबीसह झोपडपट्टीजवळ येताच तेथील लोकांमध्ये खळबळ उडाली. भूमीचे मालक आणि झोपड्यांमध्ये रहाणारे यांच्यामध्ये वाद चालू असतांना एका युवकावर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला. या वेळी झोपडपट्टीवासियांनी झोपड्या रिकाम्या करण्यास नकार दिला. आम्हाला आगाऊ कल्पना दिली नाही, असे त्यांचे म्हणणे होते; परंतु झोपड्या पाडण्याविषयी संबंधित झोपडपट्टीवासियांना कळवण्यात आले होते, असा दावा पालिकेने केला आहे. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. डिचोलीचे मामलेदार प्रवीण गावस परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्यांनी झोपडपट्टीवासियांची समजूत काढून त्यांना झोपड्या रिकाम्या करण्याचे आदेश दिले; मात्र २ घंटे प्रतीक्षा करूनही झोपडपट्टीवासियांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. शेवटी दुपारी झोपडपट्टीच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश मामलेदारांनी दिले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > डिचोली येथील पिराची कोंड भागातील १० वादग्रस्त झोपड्यांवर कारवाई
डिचोली येथील पिराची कोंड भागातील १० वादग्रस्त झोपड्यांवर कारवाई
नूतन लेख
- कोलवाळ कारागृहात बंदीवानाकडून आत्महत्येचा प्रयत्न
- प्रा. वेलिंगकर यांची उच्च न्यायालयात धाव : अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी
- जगाला तारण्यासाठी आज हिंदुत्वाची खरी आवश्यकता आहे ! – पू. भिडेगुरुजी
- श्री महालक्ष्मीदेवीची महाप्रत्यंगिरादेवीरूपात करण्यात आलेली पूजा !
- श्री तुळजाभवानीदेवीची शेषशायी अलंकार महापूजा !
- गोरखपूर येथील ‘आंतरराष्ट्रीय नाथ संमेलना’चा मिलिंद चवंडके यांच्या भाषणाने शुभारंभ