खानापुरातील एका चौकाचे ‘टिपू सुलतान चौक’ असे केलेले नामकरण पालटा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे बांधकाम खात्याला निवेदन

खानापूर शहरातील एका चौकाचे ‘टिपू सुलतान चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे. या नामकरणाला भाजप, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी विरोध केला आहे. कर्नाटक सरकारने टिपू सुलतानची जयंती बंद केली असून त्याच्याशी संबंधित इतिहास अभ्यासक्रमातून काढून टाकला आहे.

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील सुनावणी १० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली  

श्रीकृष्ण विराजमानसह ८ याचिकाकर्त्यांची याचिका न्यायालयाने स्वीकारून नोटीस दिली

हिंदु साम्राज्याची व्याप्ती !

मध्य अशियापर्यंत समुद्रगुप्तांचे हिंदु साम्राज्य पसरलेले नव्हते का ? ‘अशोकाचे काबूल, गझनी आणि कंदहारपर्यंत साम्राज्य होते ना ! दक्षिणेला वेलोरपर्यंत, ईशान्येला कामरूप’, असा हा भारत होता.

आयुर्वेद आणि भारताचे दायित्व

ऋषिमुनींनी आपल्याला दिलेली ही आयुर्वेदाची अनमोल अशी देणगी टिकवून ठेवायला हवी. जागतिक आरोग्य संघटनेच्या घोषणेनंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. आता या आयुर्वेदशास्त्राला सार्वभौमत्वाच्या सिंहासनावर पुनर्स्थापित करणे, हे प्रत्येकाचे दायित्व आहे. ते पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत !

श्रीराम आणि हनुमान यांच्यावरील श्रद्धेमुळे इतिहासाची शिक्षिका सांगत असलेल्या गोष्टी चुकीच्या असल्याचे तिला धैर्याने सांगणारा कु. संस्कार सभरवाल (वय १४ वर्षे) !

‘रामायण आणि हनुमान यांविषयी वर्गात चुकीचा इतिहास शिकवला जात आहे. हे लक्ष्यात आल्यावर श्रीराम आणि हनुमान यांच्यावरील श्रद्धेमुळे इतिहासाची शिक्षिका सांगत असलेल्या गोष्टी चुकीच्या असल्याचे तिला धैर्याने सांगणारा कु. संस्कार सभरवाल !