करवीर तालुका महिला आघाडी आणि करवीर शिवसेना यांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन ! 

राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करतांना करवीर तालुका महिला आघाडीच्या कार्यकर्त्या

कोल्हापूर, १४ जानेवारी – करवीर तालुका महिला आघाडी आणि करवीर शिवसेना यांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस करवीर तालुका महिला आघाडीच्या सौ. स्वाती राजू यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी सौ. स्वाती यादव म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाला घडवणार्‍या राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन प्रत्येक मातेने स्वत:च्या मुलाला राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध करावे आणि मुलावर संस्कार करावे.

या वेळी करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विजय गुळवे, हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, युवासेनेचे श्री. संतोष चौगुले, श्री. विराग करी,  करवीर तालुका महिला आघाडीच्या सौ. महादेवी स्वामी, सौ. अश्‍विनी चौगुले, सौ. सन्मती माळी, श्‍वेता माळी, सानिका सावंत आदी उपस्थित होते.