‘केरळ राज्यातील इयत्ता ९ वीच्या अभ्यासक्रमाच्या विज्ञान विषयाच्या क्रमिक पुस्तकात वैद्यकीय शस्त्रकर्माचे जनक सुश्रुताचार्य यांच्याऐवजी अबू अल कासीमा अलजवाहरी असल्याचे अंतर्भूत करण्यात आले आहे. भारतीय इतिहासात ८व्या शतकात सुश्रुताचार्य नावाचे प्रख्यात वैद्य होऊन गेले होते. त्यांना ‘शस्त्रकर्माचे जनक’ म्हणून जागतिक मान्यता मिळाली आहे. तरीही १० व्या शतकात होऊन गेलेल्या अबू अल कासीम अल जवाहरी यांचा उल्लेख ‘वैद्यकीय शस्त्रकर्माचा जनक’ असा करून विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास शिकवण्यात येत आहे.’