माहितीच्या अधिकारात माहिती मागवल्यावर मात्र कोणतेही पुरावे नसल्याची एन्.सी.ई.आर्.टी.ची स्वीकृती
|
नवी देहली – केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार्या एन्.सी.ई.आर्.टी.च्या (‘नॅशनल काऊंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’च्या) सयत्ता १२वीच्या ‘थीम्स ऑफ इंडियन हिस्ट्री पार्ट-टू’ या इतिहासाच्या पुस्तकातील पृष्ठ क्रमांत २३४ वर मोगल बादशहा शहाजहान आणि औरंगजेब यांनी युद्धाच्या वेळी मोगल सैन्याकडून पाडण्यात आलेल्या मंदिरांची नंतर डागडूजी करण्यासाठी आर्थिक तरतूद करून ती केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
गंगा-जमुनी तहजीब की झूठी मिसाल !
‘औरंगजेब-शाहजहां ने अनुदार देकर बनवाए मंदिर’ – @ncert के पाठ्यपुस्तकों में बिना किसी प्रमाण के पढाया जा रहा यह इतिहास – RTI में हुआ खुलासा
एक व्यक्ति ने RTI में पूछे गए प्रश्नों पर NCERT का जवाब था – “जानकारी विभाग की फाइलों में उपलब्ध नहीं है।” pic.twitter.com/Usuky9iDNV
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) January 14, 2021
तथापि याविषयी माहितीच्या अधिकाराखाली त्याविषयीचे पुरावे आणि संबंधित मंदिरांची माहिती मागण्यात आल्यावर एन्.सी.ई.आर्.टी.ने थेट याविषयीची कागदपत्रे नसल्याचे उत्तर दिले. शिक्षणक्षेत्राशी संबंधित डॉ. इंदु विश्वनाथन् यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.
१८ नोव्हेंबर २०२० या दिवशी एन्.सी.ई.आर्.टी.कडून अशा उत्तराचे पत्र अर्ज करणारे शिवांक वर्मा यांना पाठवण्यात आले आहे.
यावर ‘हेड ऑफ डिपार्टमेंट अँड पब्लिक इंफर्मेशन ऑफिसर’ प्रा. गौरी श्रीवास्तव यांची स्वाक्षरी आहे. हे पत्र डॉ. इंदू विश्वनाथन् यांनी प्रसारित केले आहे.