‘विकसित भारत २०४७’चे उद्दिष्ट गोवा सर्वांत अगोदर गाठणार ! – ओम बिर्ला, अध्यक्ष, लोकसभा

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गोवा विधानसभा सभागृहात आजी-माजी आमदार, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य यांना ‘विकसित भारत  २०४७ : लोकप्रतिनिधींची भूमिका’ या विषयावर संबोधित केले.

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या शुभहस्‍ते धर्मध्‍वजाचे पूजन !

पूजन झाल्‍यानंतर सूर्यकिरणांमुळे वातावरणात केशरी रंग पसरला होता. पूजन होईपर्यंत वातावरण निरभ्र होते आणि पूजन झाल्‍यानंतर काही वेळातच आकाशात सूर्य असतांनाच पाऊस पडला.

‘द कश्मीर फाइल्स’प्रमाणे ‘गोवा फाइल्स’ संदर्भात चर्चा होणार ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

१६ जूनपासून गोव्यात ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ !

(म्हणे) ‘पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीचे काम सरकारचे नव्हे !’ – काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन

हिंदूंसाठी आर्थिक प्रावधान केल्यावर अल्पसंख्यांक कसा गळा काढतात ? त्यांच्या पोटात कसे दुखते ? ते खासदार सार्दिन यांच्या वक्तव्यातून दिसून येते. पोर्तुगिजांनी गोमंतकीय हिंदूंवर केलेले पाशवी अत्याचार गोमतकियांनी विसरावे, असे त्यांना वाटते का ?

गोवा : कचरा व्यवस्थापन न केल्यावरून न्यायालयाकडून २ पंचायतींना प्रत्येकी ५ लाख रुपये दंड

पंचायतीचा पैसा हा जनतेच्या कराचा पैसा आहे. त्यामुळे हा दंड कचर्‍याचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरलेल्या संबंधित पंचायतीतील उत्तरदायी पंच, सरपंच यांच्या खिशातून वसूल करावा.

म्हादई प्रकरणी गोवा आणि कर्नाटक राज्यांना न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागेल ! – सी.टी. रवि

गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हादई जलविवाद न्यायाधिकरणाच्या निवाड्याला आव्हान देणारी विशेष याचिका प्रविष्ट केली आहे. या निवाड्यानुसार कर्नाटक वाटप केलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी वळवत आहे.

गोवा : केपे येथील श्री चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थानात चोरी

हिंदूंची मंदिरे असुरक्षितच ! केपे तालुक्यातील गुडी-पारोडा येथील पर्वतावरील श्री चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थानात अज्ञात चोरट्यांनी घुसून दानपेटी बाहेर आणून फोडून रोख रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना घडली. काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गोवा : सांकवाळ शंखवाळी तीर्थक्षेत्र गोशाळेला आर्थिक साहाय्य देण्यास टाळाटाळ

गोशाळांना अशा प्रकारची वागणूक भाजपच्या राज्यात अपेक्षित नाही !

आजपासून गोव्यात जी-२० सदस्य देशांच्या सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थांची शिखर परिषद

सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था शिखर परिषद-२० ही १२ ते १४ जून २०२३ या कालावधीत गोव्यात होणार आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक गिरीश चंद्र मुर्मू १२ जून २०२३ या दिवशी उद्घाटनपर भाषण देतील.

गोवा : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हणजुणे पंचायतीकडून १७५ अनधिकृत बांधकामांना नोटीस

न्यायालयाने आदेश दिल्यानंतर नोटीस पाठवणारी हणजुणे पंचायत किनारा नियंत्रण क्षेत्रात १७५ बांधकामे होत असतांना काय करत होती ? अनधिकृत बांधकामे करणार्‍यांशी पंचायतीचे साटेलोटे आहे का ? कि पंचायत निष्क्रीय आहे ?