महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने पुणे उपजिल्हाधिकार्यांना निवेदन !
पुणे, २८ सप्टेंबर (वार्ता) – तिरूपती मंदिरातील प्रसादाच्या लाडवांत चरबीयुक्त तेल मिसळणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, याविषयीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने पुणे उपजिल्हाधिकार्यांना देण्यात आले. हे निवेदन २६ सप्टेंबर या दिवशी दिले. या वेळी श्री तुकाई माता सेवा ट्रस्टचे सचिव श्री सागर तुपे, श्री गणेश मंदिर तुकाई दर्शन प्रतिष्ठानचे सल्लागार श्री दत्तात्रय कुलकर्णी, ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज उपस्थित होते.
भोर तालुका तहसीलदारांना निवेदन !
वरील मागणीसाठी भोर तालुका तहसीलदारांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी भोरेश्वर मंदिराचे विश्वस्त श्री. नंदकुमार देवी, श्री. विनायक सणस, श्री स्वामी समर्थ मंदिराचे श्री. मुकुंद रायरीकर, अन्य स्वामीभक्त, मनसेचे श्री. शशिकांत वाघ, भोर व्यापारी संघटनेचे श्री. अमोल शहा, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्वजीत चव्हाण उपस्थित होते. या वेळी तहसीलदार श्री. राजेंद्र नजन यांनी ‘तुमच्या भावना सरकारपर्यंत पोचवू’ असे आश्वासन दिले.